सार
थंडीत तेलकट त्वचा असणाऱ्या महिलांनी मॉइश्चराइजर, योग्य फेसवॉश आणि सनस्क्रिनचा वापर करावा. जेणेकरुन त्वचा मऊसर आणि कोमल राहण्यास मदत होईल, पण थंडीत तेलकट त्वचा असणाऱ्यांनी काही चुका करणे टाळले पाहिजे.
Oily Skin Care in Winter : थंडीच्या दिवसात तेलकट त्वचा असणाऱ्या महिलांना अधिक काळजी घ्यावी लागते. कारण तेलकट त्वचेमध्ये नैसर्गिक तेल होण्याची प्रक्रिया अधिक वाढली जाते. यामुळेच त्वचेला अधिक चमक येऊ शकते. अशातच थंडीत स्किन केअर रुटीन फॉलो करताना काही चुका करणे टाळले पाहिजे. योग्य पद्धतीने स्किन केअर न केल्यास त्वचा खराब होऊ शकते. जाणून घेऊया कोणत्या चुका थंडीत टाळल्या पाहिजेत याबद्दल सविस्तर...
मॉइश्चराइजर न लावणे
काही महिलांना असे वाटते की, त्वचा आधीच तेलकट असल्याने मॉइश्चराइजर लावण्याची गरज नाही. खरंतर हा एक मोठा गैरसमज आहे. थंडीत त्वचेमधील ओलसरपणा कमी होतो. यामुळे त्वचेला मॉइश्चराइजर लावणे फार गरजेचे आहे.
अत्याधिक वेळा फेसवॉश करणे
तेलकट त्वचा असणाऱ्या महिला वारंवार चेहरा धुताना दिसतात. जेणेकरुन चेहऱ्यावरील तेलकटपणा दूर होईल. पण अत्याधिक वेळेस फेसवॉश केल्याने त्वचेमधील नैसर्गित तेलाचे संतुलन बिघडले जाते. यामुळे त्वचा अधिक कोरडी, त्वचेवर खाज येणे अशा समस्या उद्भवू शकतात. याशिवाय थंडीत अत्याधिक स्क्रब किंवा हार्श क्लिंजरचा वापर करणे टाळावे.
सनस्क्रिनचा वापर न करणे
थंडीत बहुतांश महिला सनस्क्रिन लावणे टाळतात. पण असे केल्याने थंडीत त्वचेचे अधिक नुकसान होऊ शकते. सनस्क्रिन न लावल्याने वृद्धत्वाची लक्षणे चेहऱ्यावर दिसून येतात. तेलकट त्वचा असणाऱ्या महिलांनी ऑइल फ्री सनस्क्रिनचा वापर करावा.
हार्श क्लिंजरचा वापर करणे
तेलकट त्वचा असणाऱ्या महिला हार्श क्लिंजरचा वापर करतात जेणेकरुन त्वचेवरील तेल निघून जाईल. पण हार्श क्लिंजरमुळे त्वचेवरील नैसर्गित तेल निघून जाते. अशातच त्वचा कोरडी आणि निस्तेज होते.
त्वचेला अधिक एक्सफोलिएट करणे
त्वचा फ्रेश आणि स्वच्छ राहण्यासाठी काहीजण स्क्रब लावतता. पण अत्याधिक प्रमाणात थंडीत त्वचेला एक्सफोलिएट केल्यास त्वचेचे नुकसान होऊ शकते. स्क्रबमुळे त्वचेवर जळजळ, सूज किंवा कोरडी होणे अशा समस्या उद्भवू शकतात.
(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
आणखी वाचा :