थंडीच्या दिवसात उबदार कपडे परिधान केले जातात. अशातच काहींना लोकरीचे कपडे परिधान केल्यानंतर त्वचेला खाज येण्याची समस्या उद्भवते. तर कोणते घरगुती उपाय करावेत याबद्दल जाणून घेऊया…
कॉटनच्या अंडरगार्मेंट्सवर उबदार कपडे परिधान करा. यामुळे थेट उबदार कपड्यांचा त्वचेला स्पर्श होणार नाही.
थंडीच्या कपड्यांमुळे त्वचेला येणारी खाज दूर करण्यासाठी आंघोळीनंतर मॉइश्चराइझर लावा. यामुळे त्वचा मऊ देखील होईल.
त्वचेला खाज येत असल्यास एलोवेरा जेलने मसाज करा. यामुळे त्वचेला थंडावा मिळेल.
दररोज संपूर्ण शरिराला राई किंवा नारळाच्या तेलाने मसाज करा. यावेळी तेल थोडे कोमट गरम करा.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
उबदार कपड्यांमुळे त्वचेला खाज येत असल्यास त्या ठिकाणी खाजवू नका. अन्यथा समस्या अधिक वाढली जाते.