MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Zipper Repair : बॅग, पॅन्ट, स्वेटरची 'झिप' तुटली? या ५ टिप्स वापरून मिनिटांत करा दुरुस्त!

Zipper Repair : बॅग, पॅन्ट, स्वेटरची 'झिप' तुटली? या ५ टिप्स वापरून मिनिटांत करा दुरुस्त!

बॅग किंवा कपड्यांची झिप खराब झाली म्हणून फेकून देण्याऐवजी, घरातल्याच वस्तू वापरून तुम्ही ती सहज दुरुस्त करू शकता. प्लायर, पेन्सिल, साबण अशा गोष्टींनी झिप दुरुस्त करण्याचे ५ सोपे उपाय जाणून घ्या.

2 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Aug 14 2026, 03:23 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
बॅगेची झिप तुटल्यास काय करावे?
Image Credit : Facebook/YouTube

बॅगेची झिप तुटल्यास काय करावे?

प्रवासात बॅगेची झिप तुटली किंवा थंडीत आवडत्या स्वेटरची झिप खराब झाली की खूप वैताग येतो. पण आता झिप खराब झाली म्हणून बॅग फेकून देण्याची किंवा शिंप्याकडे धाव घेण्याची गरज नाही. घरातल्याच काही वस्तू वापरून तुम्ही काही मिनिटांत ती दुरुस्त करू शकता. यासाठी या ५ सोप्या आणि उपयुक्त टिप्स नक्की वाचा:
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
१. प्लायर (Pliers) वापरा
Image Credit : Asianet News

१. प्लायर (Pliers) वापरा

झिप लावल्यावरही तिचे दात नीट लागत नसतील आणि ती उघडत असेल, तर झिपचा रनर (स्लायडर) सैल झाला आहे, असं समजा. प्लायर घेऊन रनरच्या मागच्या बाजूने दोन्ही बाजूंना हलकेच दाबा. असं केल्याने रनर घट्ट होईल आणि झिप पुन्हा व्यवस्थित काम करू लागेल.

Related Articles

Related image1
Pressure Cooker : कुकरमधून पाणी बाहेर येतंय? या सोप्या टिप्स वापरा, प्रॉब्लेम लगेच सॉल्व्ह होईल
Related image2
Fridge Maintenance : फ्रीज वापरताना या 8 चुका टाळा, लाईट बिल वाचवा!
36
२. पेन्सिलची ग्रेफाइट (Pencil Lead)
Image Credit : Facebook/YouTube

२. पेन्सिलची ग्रेफाइट (Pencil Lead)

झिप मध्येच अडकली असेल आणि पुढे-मागे सरकत नसेल, तर एक पेन्सिल घ्या. तिचं टोक झिपच्या दातांवर चांगलं घासा. पेन्सिलमधील ग्रेफाइट नैसर्गिक ल्युब्रिकंटप्रमाणे काम करतं आणि त्यामुळे झिप पुन्हा सहज सरकू लागते.

46
३. काटा चमचा (Fork) वापरा
Image Credit : Facebook/YouTube

३. काटा चमचा (Fork) वापरा

झिपचा रनर पूर्णपणे बाहेर निघाला असेल, तर एका काटा चमच्याच्या (फोर्क) टोकामध्ये रनरला अडकवून घट्ट पकडा. त्यानंतर बॅग किंवा स्वेटरच्या झिपची दोन्ही टोकं रनरमध्ये ढकला. यामुळे झिप सहजपणे पुन्हा लागते.

56
४. पेपर क्लिप किंवा की-रिंग
Image Credit : Facebook/YouTube

४. पेपर क्लिप किंवा की-रिंग

झिप ओढायचा हँडल (Pull tab) तुटला असेल, तर त्याच्या छोट्या छिद्रात एक पेपर क्लिप किंवा जुनी की-रिंग अडकवा. तात्पुरतं काम भागवण्यासाठी हा एक उत्तम उपाय आहे आणि झिप ओढायला खूप मदत होते.

66
५. साबण किंवा व्हॅसलीन
Image Credit : Facebook/YouTube

५. साबण किंवा व्हॅसलीन

झिप खूप घट्ट झाली असेल, तर सुक्या साबणाचा तुकडा, व्हॅसलीन किंवा खोबरेल तेल झिपच्या दातांवर लावा. त्यानंतर २-३ वेळा झिप ओढल्यास ती लगेच स्मूथ होईल. हे सोपे उपाय वापरल्यास तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल!

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Chanakya Niti : तुमचा अपमान करणाऱ्यांशी कसं वागायचं? चाणक्य नीती काय सांगते पाहा
Recommended image2
Brain Foods For Kids: मुलांची बुद्धिमत्ता वाढवणारे हे आहेत सुपरफूड्स
Recommended image3
Soap Side Effects: रोज साबण लावल्याने खाज येते का? डॉक्टरांचा सल्ला!
Recommended image4
Gold Bangles: रोजच्या वापरासाठी हे आहेत सोन्याच्या बांगड्यांचे बेस्ट डिझाईन्स
Recommended image5
Wet Salt Hack : मिठाच्या डब्यात पाणी गेलंय? या सोप्या ट्रिकने मीठ पुन्हा कोरडं करा
Related Stories
Recommended image1
Pressure Cooker : कुकरमधून पाणी बाहेर येतंय? या सोप्या टिप्स वापरा, प्रॉब्लेम लगेच सॉल्व्ह होईल
Recommended image2
Fridge Maintenance : फ्रीज वापरताना या 8 चुका टाळा, लाईट बिल वाचवा!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved