Fridge Maintenance : फ्रीज वापरताना या 8 चुका टाळा, लाईट बिल वाचवा!
तुमच्या फ्रिजमध्ये गरजेपेक्षा जास्त बर्फ साचतोय का? यामुळे फ्रिज नीट काम करत नाही आणि लाईट बिलही वाढतं. फ्रिजमध्ये बर्फ का साचतो आणि ते टाळण्यासाठी 8 सोपे उपाय काय आहेत, ते जाणून घेऊया.
18
Image Credit : AI Image
काही छोट्या चुकाच कारण
तुमच्या फ्रिजमध्ये खूप जास्त बर्फ (Ice) साचतोय का? अनेकदा आपल्या नकळत होणाऱ्या काही छोट्या चुकांमुळेच असं होतं. या चुका कशा सुधारायच्या? चला पाहूया.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source

28
Image Credit : Asianet News
Door Gasket
फ्रिजच्या दाराचं रबर (गॅस्केट) सैल किंवा जुनं झालं असेल, तर बाहेरची गरम हवा आत शिरते. या हवेतील ओलाव्यामुळेच बर्फ तयार होतो. त्यामुळे दार नीट बंद होतंय की नाही, हे तपासा.
38
Image Credit : Chatgpt
यामुळे ओलावा वाढतो
फ्रिजचं दार जास्त वेळ उघडं ठेवलं किंवा सारखं उघड-बंद केलं, तर आतलं तापमान बिघडतं. यामुळे ओलावा वाढतो आणि बर्फ साचायला सुरुवात होते.
48
Image Credit : Chatgpt
बर्फाचे खडे तयार होतात
फ्रिजचं तापमान (थर्मोस्टॅट) खूप कमी सेट केलं, तर कुलिंग जास्त होऊन बर्फाचे खडे तयार होतात. बाहेरच्या हवामानानुसार तापमान योग्य ठेवणं महत्त्वाचं आहे.
58
Image Credit : gemini
फ्रीझरमध्ये घट्ट बर्फाचं रूप
गरम दूध किंवा भाजी थेट फ्रिजमध्ये ठेवू नका. गरम पदार्थांमधून येणारी वाफ थंड होऊन फ्रीझरमध्ये घट्ट बर्फाचं रूप घेते.
68
Image Credit : Asianet News
Drain Hole
फ्रिजमधलं पाणी बाहेर जाण्यासाठी एक लहान छिद्र (ड्रेन होल) असतं. हे छिद्र घाणीमुळे बंद झालं, तर पाणी बाहेर न जाता आतच साचतं आणि त्याचा घट्ट बर्फ बनतो. ही पाण्याची पाईप वेळोवेळी स्वच्छ करा.
78
Image Credit : Chatgpt
Overloading
फ्रिजमध्ये क्षमतेपेक्षा जास्त सामान भरल्यास आतल्या हवेच्या खेळती राहण्यात (एअर सर्क्युलेशन) अडथळा येतो. हवा खेळती न राहिल्यास बर्फाची समस्या वाढते.
88
Image Credit : Asianet News
डीफ्रॉस्ट सेन्सरमध्ये बिघाड
जर फ्रिजचं ऑटो-डीफ्रॉस्ट (Auto-Defrost) फीचर काम करत नसेल किंवा डीफ्रॉस्ट सेन्सरमध्ये बिघाड झाला असेल, तर बर्फ जास्त साचतो. अशावेळी लगेच टेक्निशियनची (Technician) मदत घ्या.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

