होळीच्या सणाला पारंपरिक पण तितकाच रॉयल लूक हवा असेल, तर म्हैसूर सिल्क ब्लाउजपेक्षा उत्तम काही नाही. होळी 2026 साठी हे ५ खास डिझाइन्स तुमच्या साडीला एक वेगळाच फेस्टिव्ह आणि आकर्षक टच देतील.
होळीचा सण म्हणजे फक्त पूजा नाही, तर छान तयार होऊन मिरवण्याचीही एक संधी असते. तुम्हाला यंदा काहीतरी क्लासी आणि रॉयल ट्राय करायचं असेल, तर म्हैसूर सिल्क (Mysore Silk) ब्लाउज तुमच्या साडीला एक रिच आणि एलिगंट लुक देऊ शकतो. म्हैसूर सिल्कचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं स्मूद टेक्स्चर, हलकी चमक आणि सॉफ्ट फॉल. यामुळे साध्या साडीवरही याचा ब्लाउज घातल्यावर संपूर्ण लुक खुलून दिसतो. होळीच्या पूजेसाठी हे ५ सुंदर डिझाइन्स नक्की बघा.
गोल्ड जरी बॉर्डर म्हैसूर सिल्क ब्लाउज
जर तुम्हाला पारंपरिक लूक आवडत असेल, तर गोल्ड जरी बॉर्डर असलेला ब्लाउज निवडा. याच्या बाह्यांवर रुंद जरी बॉर्डर आणि पाठीमागे साधं हुक क्लोजर खूपच क्लासी दिसतं. तुम्ही लाल, मरून किंवा रॉयल ब्लू रंगाचा ब्लाउज निवडू शकता. हा पूजेसाठी परफेक्ट आहे आणि साडीला एक रॉयल टच देतो.
एल्बो स्लीव्ह टेंपल मोटिफ ब्लाउज
तुम्हाला साऊथ इंडियन टच आवडत असेल, तर टेंपल मोटिफ डिझाइन बेस्ट पर्याय आहे. कोपरापर्यंत लांब बाह्या (एल्बो लेंथ स्लीव्ह), सोन्याच्या धाग्यांनी केलेली एम्ब्रॉयडरी आणि पाठीमागे डीप राऊंड नेक खूपच आकर्षक दिसतो. सिल्क किंवा कांजीवरम साडीसोबत असा ब्लाउज खूपच छान दिसेल. हा तुम्हाला एक क्लासी आणि ग्रेसफुल लूक देईल.
हाय नेक मिनिमल सिल्क ब्लाउज
जर तुम्हाला मॉडर्न आणि पारंपरिक यांचं फ्युजन हवं असेल, तर हाय नेक डिझाइन निवडा. अशा प्रकारचे ब्लाउज पेस्टल किंवा मस्टर्ड रंगांमध्ये खूप सुंदर दिसतात. जास्त नक्षीकाम नसलेला आणि पुढच्या बाजूला क्लीन कट असलेला हा ब्लाउज साध्या साडीवरही स्टायलिश दिसतो.
पफ स्लीव्हज म्हैसूर सिल्क ब्लाउज
होळीच्या फेस्टिव्ह मूडसाठी पफ स्लीव्हज असलेला म्हैसूर सिल्क ब्लाउज एकदम परफेक्ट आहे. हा तुम्हाला यंग आणि फ्रेश लूक देतो. सध्या रेट्रो स्टाइलचा ट्रेंड असल्यामुळे हा प्रकार खूपच लोकप्रिय आहे. यामध्ये तुम्ही शॉर्ट पफ स्लीव्हज, स्क्वेअर किंवा स्वीटहार्ट नेकलाइन बनवू शकता. गुलाबी, हिरवा किंवा नारंगी यांसारखे ब्राईट रंग यात छान दिसतील.
बॅकलेस दोरी स्टाइल ब्लाउज
तुम्हाला थोडा ग्लॅमरस लूक हवा असेल, तर पाठीमागे दोरी असलेलं डिझाइन निवडा. यामध्ये तुम्ही डीप बॅक कट, टसल किंवा मोत्यांची दोरी लावू शकता. गोल्डन किंवा वाइन कलरमध्ये हा ब्लाउज खूपच रिच दिसतो. फेस्टिव्ह पार्टीसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.


