PM Modi Makes History in Israel : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इस्रायल दौरा ऐतिहासिक ठरला आहे. ते इस्रायलच्या संसदेत भाषण करणारे आणि 'स्पीकर ऑफ द क्नेसेट मेडल' हा सर्वोच्च सन्मान मिळवणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत.

PM Modi Makes History in Israel : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दोन दिवसीय इस्रायल दौऱ्यात एक नवा इतिहास रचला आहे. इस्रायलच्या संसदेत भाषण करणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. एवढंच नाही, तर त्यांना इस्रायलच्या संसदेचा सर्वोच्च सन्मानही मिळाला आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि खासदारांच्या उपस्थितीत मोदींनी टाळ्यांच्या कडकडाटात भाषण केलं. यानंतर, इस्रायलच्या संसदेने पंतप्रधान मोदींना 'स्पीकर ऑफ द क्नेसेट मेडल' (Speaker of the Knesset Medal) देऊन सन्मानित केलं. हा क्नेसेटचा (इस्रायली संसद) सर्वोच्च सन्मान असून, तो मिळवणारे मोदी पहिलेच भारतीय पंतप्रधान आहेत. भारत आणि इस्रायलमधील सामरिक संबंध मजबूत करण्यासाठी मोदींनी दिलेल्या योगदानाबद्दल हा पदक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

मोदींच्या 'हग'ची नेतन्याहूंना भुरळ

जेरुसलेम: पंतप्रधान मोदींची वैयक्तिक गळाभेट खूप खास असते. याला 'मोदी हग' असं म्हटलं जातं आणि ते जगभरात प्रसिद्ध आहे, अशा शब्दांत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मोदींचं कौतुक केलं.

संसदेत 'मोदी-मोदी'च्या घोषणा

जेरुसलेम: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलच्या 'क्नेसेट' या संसदेत प्रवेश करताच सर्व खासदारांनी 'मोदी-मोदी' अशा घोषणा दिल्या. विशेष म्हणजे, त्यांच्या भाषणादरम्यान खासदारांनी तब्बल ६ वेळा उभं राहून टाळ्या वाजवत त्यांचं कौतुक केलं.

मोदी, तुमचे आभार: नेतन्याहू

"तुम्ही इस्रायलच्या बाजूने उभे राहिलात, धन्यवाद माझ्या मित्रा..," असं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आपल्या भाषणात म्हणाले. तेव्हा मोदींनी हस्तांदोलन करून त्यांचे आभार मानले.

मोदी-नेतन्याहू यांच्यात यशस्वी चर्चा

जेरुसलेम: इस्रायल दौऱ्यावर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तिथले पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यात विमानतळावर एक छोटी पण महत्त्वाची बैठक झाली.

याबद्दल मोदींनी 'X' वर माहिती दिली. त्यांनी लिहिलं, "९ वर्षांनंतर इस्रायलला येऊन आनंद झाला. पंतप्रधान नेतन्याहू यांच्यासोबत चांगली चर्चा झाली. आम्ही तंत्रज्ञान, पाणी व्यवस्थापन, कृषी, टॅलेंट पार्टनरशिप यांसारख्या अनेक क्षेत्रांवर चर्चा केली, जेणेकरून दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होतील. तसेच, आम्ही प्रादेशिक घडामोडींवरही चर्चा केली."