चमकदार त्वचेसाठी घरच्याघरी तयार करा हे 5 Home made Scrub
Home made scrub for glowing face : आपली त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी स्क्रबिंग महत्त्वाचं आहे. बाजारातील स्क्रबमध्ये केमिकल्स असू शकतात, पण घरच्या घरी तयार केलेले स्क्रब नैसर्गिक, सुरक्षित आणि परिणामकारक असतात.

साखर आणि मधाचा स्क्रब
साहित्य:
- 1 चमचा साखर
- 1 चमचा मध
कसे तयार करावे:
साखर आणि मध एकत्र मिक्स करा. ही पेस्ट चेहऱ्यावर किंवा शरीरावर लावून 2-3 मिनिटं हलक्या हाताने गोलाकार मसाज करा. नंतर कोमट पाण्याने धुवा.
उपयोग : त्वचा मृदू आणि हायड्रेटेड राहते.
कॉफी आणि खोबरेल तेल स्क्रब
साहित्य :
- 2 चमचे कॉफी पावडर
- 1 चमचा खोबरेल तेल
कसे तयार करावे:
दोन्ही घटक चांगले मिक्स करून त्वचेवर मसाज करा. 5 मिनिटं ठेवा आणि नंतर धुवा.
उपयोग: मृत त्वचा दूर करते, त्वचा फ्रेश वाटते.
बेसन आणि हळद स्क्रब
साहित्य :
- 2 चमचे बेसन
- 1 चिमूट हळद
- थोडं दूध किंवा दही
कसे तयार करावे :
सर्व साहित्य मिक्स करून पेस्ट बनवा. चेहऱ्यावर लावून 5-10 मिनिटं वाळू द्या, नंतर हलक्या हाताने स्क्रब करत धुवा.
उपयोग : त्वचा उजळते आणि मुरुम कमी होतात.
ओट्स आणि दही स्क्रब
साहित्य :
- 1 चमचा बारीक ओट्स
- 1 चमचा दही
कसे तयार करावे :
दोन्ही एकत्र करून चेहऱ्यावर लावून सौम्य स्क्रब करा. नंतर थंड पाण्याने धुवा.
उपयोग : कोरडी त्वचा सॉफ्ट होते, डेड स्किन निघते.
लिंबू आणि साखर स्क्रब
साहित्य:
- 1 चमचा साखर
- 1/2 लिंबाचा रस
कसे तयार करावे :
साखर आणि लिंबू एकत्र करून कोपर, गुडघे किंवा टाचांवर स्क्रब करा.
उपयोग : टॅनिंग दूर होते, त्वचा उजळते.
या गोष्टी ठेवा लक्षात
- स्क्रब करताना जास्त दाब देऊ नका.
- आठवड्यातून 1-2 वेळा स्क्रब करणे पुरेसे आहे.
- स्क्रब केल्यावर नेहमी मॉइश्चरायझर लावावा.
(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

