सार

उन्हाळ्याच्या दिवसात शरीरातून अत्याधिक घाम निघून जात असल्याने डिहाइड्रेशनची समस्या होऊ लागते. यापासून बचाव करण्यासाठी उन्हाळ्यात काही फळांचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

5 healthy fruits for summer : उन्हाळ्याच्या दिवसात शरीरातील पाणी कमी होणे सामान्य बाब आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे शरीर लगेच डिहाइड्रेट होते. यामुळे थकवा जाणवू लागतो. डिहाइड्रेशनच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी उन्हाळ्यात भरपूर प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय पाणीदार फळे आणि भाज्यांही खाव्यात असे सांगितले जाते. जाणून घेऊया उन्हाळ्यात डाएटमध्ये कोणत्या फळांचा समावेश करावा. जेणेकरुन शरीराला थंडवा मिळण्यासह दिवसभर उत्साही देखील राहण्यास मदत होईल.

कलिंगड

उन्हाळ्यात कलिंगडची विक्री मोठ्या प्रमाणात होते. याचे सेवन करू शकता. कलिंगडमध्ये 90 टक्के पाणी असते. यामुळे शरीर हाइड्रेट होण्यास मदत होते. याशिवाय कलिंगडमध्ये अँटीऑक्सिडेंट्स आणि व्हिटॅमिन असतात, जे त्वचेला ग्लो आणण्यासह पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात.

अननस

अननसाचे उन्हाळ्यात सेवन करू शकता. याचे सेवन केल्याने उष्णतेपासून आराम मिळू शकतो. यामध्ये 80 टक्के पाणी असते. व्हिटॅमिन सी युक्त अननसाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती बूस्ट होते. याशिवाय पचनक्रियाही सुधारली जाते. अननसाची स्मूदी किंवा फळ खाऊ शकता.

आंबा

फळांचा राजा म्हटल्या जाणाऱ्या आंब्याचे उन्हाळ्यात सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. याची चव गोड सराळ असते. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हिटॅमिन असतात, जे त्वचेवर ग्लो आणण्यासह आरोग्य हेल्दी ठेवण्यास मदत करतात.

द्राक्षे

उन्हाळ्यात द्राक्षांचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. यामुळे शरीराला थंडावा मिळतो आणि हाइड्रेटही राहता. यामध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते. द्राक्षांचे सेवन केल्याने शरीर डिटॉक्स होण्यासह रोगप्रतिकारक शक्ती वाढली जाते.

नारळाचे पाणी

उन्हाळ्यात नारळाचे पाणी दिवसातून दोनदा पिऊ शकता. यामुळे डिहाइड्रेशनच्या समस्येपासून दूर राहू शकता. याशिवाय शरीर डिटॉक्स करण्यासह पोटात थंडावा निर्माण होतो.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)