Intermittent Fasting वेळी प्या हे 4 ज्यूस, वेगाने बर्न होईल चरबी

| Published : Sep 19 2024, 08:38 AM IST / Updated: Sep 19 2024, 08:39 AM IST

Weight Loss Juice

सार

Intermittent Fasting Drinks : सध्या वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या एक्सरसाइज आणि डाएटचा आधार घेतला जातो. अशातच सध्या इंटरमिटेंट फास्टिंगचा ट्रेन्ड वाढला आहे. यामुळे वजनासह शरिराची चरबीही वेगाने कमी होऊ लागते.

Intermittent Fasting Drinks : वजन कमी करण्यासाठी सध्या इंटरमिटेंट फास्टिंग एक बेस्ट पर्याय मानला जात आहे. काही आरोग्य तज्ज्ञ वेगाने वजन कमी करण्यासाठी इंटरमिटेंट फास्टिंगचा सल्ला देतात. या फास्टिंगमध्ये शरिराचा आकार आणि फॅट्सच्या आधारवर तुमचा डाएट प्लॅन आणि फास्टिंग वेळ ठरवली जाते. फास्टिंगवेळी कोणत्याही खाद्यपदार्थाचे सेवन करू शकत नाही अशीही अट घातली जाते. पण झिरो कॅलरी ड्रिंक जसे की, पाणी, ब्लॅक कॉफी आणि लिंबू पाणी पिऊ शकता. या ड्रिंक्समुळे मेटॉबॉलिज्म उत्तम होणे, भूक कमी लागणे आणि शरीर हाइड्रेट राहण्यास मदत होते. तुम्हाला शरिरातील चरबी वेगाने कमी करायची असल्यास इटरमिटेंट फॅट लॉस ड्रिंक्स पिऊ शकता. याबद्दलच पुढे सविस्तर जाणून घेऊया...

अ‍ॅप्पल साइडर व्हिनेगर


वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी बहुतांशजण अ‍ॅप्पल साइडर व्हिनेगरची मदत घेतात. अ‍ॅप्पल साइडर व्हिनेगरमुळे रक्तातील साखरेचा स्तर कमी करणे आणि इंन्सुलिन सेंसिटिव्हिटीमध्ये सुधारणा करण्यास मदत करते. यामुळे वेगाने वजन कमी होते. याशिवाय अ‍ॅप्पल साइडर व्हिनेगरमुळे भूक नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. एवढेच नव्हे शरिरातील व्हिटॅमिन सी आणि ए ची कमतरताही दूर होऊ शकते.

हर्बल टी


इटरमिटेंट फास्टिंगवेळी हर्बल टी पिऊ शकता. पुदीना, कॅमोमाइल, आलं आणि ग्रीन टी सारख्या हर्बल टी शरिराची पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. याशिवाय सूज येणे, स्नायूंचे दुखणे आणि तणाव कमी करण्यासही मदत करतात. वजन कमी करणे, भूक नियंत्रणात ठेवणे आणि मेटाबॉलिज्म सुधारण्यासाठी हर्बल टी पिणे फायदेशीर ठरू शकते.

नारळाचे पाणी

नारळाचे पाणी देखील इंटरमिटेंट फास्टिंगवेळी पिऊ शकता. यामध्ये कमी प्रमाणात कॅलरीज असल्या तरीही इलेक्ट्रोलाइट्स अधिक असल्याने डिहाइड्रेशनच्या समस्येपासून दूर राहता. नारळाच्या पाण्यामुळे शरिराला उर्जा मिळते. वेगाने चरबी कमी करणे ते मेटाबॉलिज्म वाढवण्यासही नारळाचे पाणी पिऊ शकता.

इलेक्ट्रोलाइट वॉटर


इलेक्ट्रोलाइट वॉटर शरिराला उर्जा देण्याचे काम करते. इंटरमिटेंट फास्टिंगवेळी शरिरात सोडियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचे प्रमाण कमी होते. याच्या सेवनाने डिहाइड्रेशनच्या स्थितीपासून दूर राहता. पण इलेक्ट्रोलाइट वॉटरचे मर्यादित प्रमाणात सेवन करावे असा सल्ला दिला जातो.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

अस्वच्छ Travel Luggage Bag घरच्याघरीही करता येईल स्वच्छ, वापरा या सोप्या ट्रिक्स

उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी खा या 5 डाळी, आजारांपासून रहाल दूर