सार

High Blood Pressure Tips : उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळवण्यासाठी डाळींचे सेवन करू शकता. जेणेकरुन आरोग्यासंबंधित काही आजारांपासून दूर राहू शकता.

High Blood Pressure Tips : उच्च रक्तदाबाची समस्या असणाऱ्या व्यक्तींनी खाण्यापिण्यावर विशेष लक्ष दिले पाहिजे. हिरव्या भाज्या ते कडधान्यांव्यतिरिक्त काही डाळींच्या सेवनाने उच्च रक्तदाबाच्या समस्येवर नियंत्रण मिळवले जाऊ शकते. खरंतर, काही डाळींमध्ये पोटॅशियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. यामुळे उच्च रक्तदाब कमी केला जाऊ शकतो. जाणून घेऊया अशा डाळींबद्दल ज्याच्या माध्यमातून उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळवले जाऊ शकते.

मटकी
मटकीमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते. याच्या माध्यमातून एंजाइमची क्रिया रोखली जाऊ शकते. अशातच उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळवण्यासाठी आहारात मटकीचा समावेश करू शकता.

तूर डाळ
तूर डाळीचा वापर भारतीयांच्या जेवणामध्ये जरुर केला जातो. यामध्ये प्रोटीन आणि फायबरव्यतिरिक्त फोलिक अ‍ॅसिड उच्च प्रमाणात असल्याने अ‍ॅनिमियाच्या समस्येपासून दूर राहता. गर्भवती महिलांना तूर डाळीच्या माध्यमातून पोटातील बाळाचा व्यवस्थित विकास होण्यास मदत होऊ शकते. उच्च रक्तदाबाच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी नक्की तूर डाळीचे सेवन करू शकता.

मूग डाळ
मूग डाळीत भरपूर प्रमाणात लोह आणि पोटॅशियम असते. शरिरातील हिमग्लोबीनचा स्तर कायम ठेवण्यासाठी मूग डाळीचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. पोटॅशियमच्या कारणास्तव उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळवण्यास मदत होऊ शकते.

चणा डाळ
चणा डाळीच्या माध्यमातून उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळवले जाऊ शकते. यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन बी असल्याने शरिराला उर्जा मिळण्यास मदत होते. यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असल्याने मधुमेहाच्या रुग्णांना रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासही मदत करते. चणा डाळीमधील फायबरमुळे शरिरातील कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी होण्यासही मदत होते.

मसूर डाळ
अन्य डाळींप्रमाणे मसूर डाळीमुळेही रक्तातील साखर कमी होण्यास मसूर डाळ मदत करते. भोजनानंतर उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळवण्यासाठी मसूर डाळीचे सेवन करू शकता.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

लिंबू खाण्याचे 5 फायदे, अ‍ॅसिडिटीवर ठरते गुणकारी

तूप खाण्याचे 7 आरोग्यदायी फायदे, पचनशक्ती सुधारण्यास होईल मदत