सार
कॉफी पिणे बहुतांशजणांना आवडते. पण काही पदार्थ कॉफी प्यायल्यानंतर अजिबात खाऊ नयेत असा सल्ला दिला जातो. यामुळे आरोग्यासंबंधित काही गंभीर समस्या उद्भवू शकतात.
Foods Avoid With Coffee : बहुतांशजण सकाळची सुरुवात ते रात्रीच्या दरम्यान बऱ्याचवेळा कॉफी किंवा चहाचे सेवन करतात. कॉफीच्या माध्यमातून शरिराला काही पोषण तत्त्वे मिळतात. पण कॉफीचे अत्याधिक सेवन करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. यासोबत कॉफी प्यायल्यानंतर काही पदार्थांचे सेवन करणेही टाळावे. यामुळे आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवल्या जाऊ शकतात. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.
आंबट फळं
कॉफी नैसर्गिक रुपात आम्लीय असते. यामुळे आंबट फळांचे सेवन कॉफीसोबत केल्याने छातीत जळजळ किंवा पचनासंबंधित समस्या उद्भवली जाऊ शकते. कॉफी आणि आंबट फळांचे एकत्रित सेवन केल्याने पोटासंबंधितही समस्या उद्भवल्या जाऊ शतात.
मासे आणि कॉफी
कॉफीचे अत्याधिक सेवन केल्याने आतड्यांमध्ये पोषण तत्त्वांचे अवशोषण करणे प्रभावित होऊ शकते. याशिवाय कॉफीसोबत मासे किंवा रेड मीटचे सेवन करणे टाळावे. यामुळे आरोग्यासंबंधित समस्या उद्भवल्या जाऊ शकतात.
तळलेले पदार्थ
अत्याधिक तळलेल्या पदार्थांचे सेवन कॉफीसोबत करणे टाळावे. काही संशोधनातून असे समोर आले आहे की, कॉफीसोबत तळलेल्या पदार्थांचे सेवन केल्याने शरिरातील कोलेस्ट्रॉलचा स्तर अधिक वेगाने वाढला जाऊ शकते. तळलेले पदार्थ बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत करतात. याचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
आणखी वाचा :
कोलेस्ट्रॉल, मधुमेहाच्या रुग्णांनी नाश्तामध्ये खा हे 5 फूड्स, रहाल हेल्दी