कोलेस्ट्रॉल, मधुमेहाच्या रुग्णांनी नाश्तामध्ये खा हे 5 फूड्स, रहाल हेल्दी

| Published : Jan 14 2025, 01:55 PM IST

Diet
कोलेस्ट्रॉल, मधुमेहाच्या रुग्णांनी नाश्तामध्ये खा हे 5 फूड्स, रहाल हेल्दी
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

सकाळचा नाश्ता करणे टाळू नये असे सांगितले जाते. अशातच कोलेस्ट्रॉल आणि मधुमेहाच्या रुग्णांनी नाश्तामध्ये कोणते फूड्सचे सेवन करावे याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Health Care Tips : सकाळचा नाश्ता करणे कधीच टाळू नये. अन्यथा दिवसभरासाठी शरिराला लागणारी उर्जा पुरेशा प्रमाणात मिळत नाही. अशातच नाश्तामध्ये योग्य फूड्सची निवड करावी. खासकरुन एखाद्या आजाराचा सामना करत असाल तर हेल्दी नाश्ता करावा. जेणेकरुन शरिराला उर्जा मिळण्यासह मानसिक रुपातही हेल्दी राहण्यास मदत होईल. जाणून घेऊया कोलेस्ट्रॉल आणि मधुमेहाच्या रुग्णांना सकाळच्या नाश्तामध्ये कोणत्या प्रकारच्या फूड्सचे सेवन करावे याबद्दल सविस्तर...

ओट्स

ओट्स नाश्तासाठी बेस्ट पर्याय आहे. यामध्ये उच्च प्रमाणात फायबर, प्रोटीन आणि काही प्रकारची पोषण तत्त्वे असतात. ओट्सचे सेवन केल्याने दीर्घकाळ पोट भरल्यासारखे राहते आणि भूक लागत नाही. याशिवाय शरिरातील कोलेस्ट्रॉलचा स्तरही नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. ओट्सचे सेवन दूधात किंवा पाण्यात भिजवून फळ आणि ड्राय फ्रुट्सोबत करू शकता.

दही

दह्यामध्ये प्रोटीन आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. दही पोटासाठी फायदेशीर मानले जाते. यामध्ये असणाऱ्या प्रोबायोटिक्समुळे पचनक्रिया सुधारली जाते. ड्राय फ्रुट्स, ओट्ससोबत दह्याचे सेवन करू शकता.

फळं

फळांचे सकाळी सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. फळांमध्ये संत्र, केळ किंवा जांभूळ याचा समावेश केल्यास शरिराला व्हिटॅमिन, खनिज आणि अँटी-ऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात मिळतात. यामुळे शरिराला उर्जा मिळण्यासह रोगप्रतिकारक शक्ती वाढली जाते. फळांचा सॅलड किंवा ज्यूसच्या रुपातही सेवन करू शकता.

अंड

अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते. अंड्याचा सकाळच्या नाश्तामध्ये समावेश करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. अंड्याचे ऑम्लेट किंवा उकडून सेवन करू शकता. मधूमेहाच्या रुग्णांनी देखील अंड्याचे सेवन करणे फायदेशीर ठरेल.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

फिट, मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी करा ही 3 योगासने, वाचा फायदे

पोटाची चरबी कमी करण्याचे 6 सोपे व्यायाम,