पोटाची चरबी कमी करण्यासाठी हेल्दी सूप्स, खिचडी अशा पदार्थांचा रात्रीच्या जेवणात असायला हवेत. यामुळे वजन देखील कमी होण्यास मदत होईल. जाणून घेऊया रात्री कोणते पदार्थ खावेत.
मुगाच्या डाळीची मऊ खिचडी रात्रीच्या जेवणसाठी उत्तम पर्याय आहेत. यात कमीत कमी कॅलरीज असतात आणि पोट भरल्यासारखे वाटते.
बरेचजण नाश्त्यााला ओट्स खातात पण जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर ओट्स रात्रीच्या जेवणातही खाऊ शकता. ओट्समध्ये फायबर्सचे प्रमाण जास्त असते.
तुम्ही रात्रीच्या जेवणाच्यावेळी सूप किंवा डोसा खाऊ शकता. यामुळे तुमचं पोट बराचवेळ भरलेलं राहीलं आणि वजन कमी करण्यास मदत होईल.
रात्रीच्या वेळी भाज्या खाल्ल्याने मेटाबॉलिझ्म बुस्ट होतो आणि वजन कमी होण्यास मदत होते. यावेळी भाज्यांचे सूप पिऊ शकता.
मूग डाळीत फायबर्स आणि प्रोटीन्स मोठ्या प्रमाणात असतात. मूगाच्या डाळीच्या डोशाचे सेवन केल्याने शरीर निरोगी राहण्यास मदत होते. रात्रीच्या जेवणात तुम्ही मूग डाळीच्या डोसा खाऊ शकता.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.