पायल कपाडिया ही पहिली भारतीय दिग्दर्शक आहे जिने कान्स 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय मंचावर भारताचे नाव अभिनमाने उंचावले आहे. चला जाणून घेऊया कोण आहे पायल कपाडिया?
राजकोटमध्ये गेमिंग झोनमध्ये झालेल्या अपघातात 30 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामधील काही मृतदेहांची ओळख पटलेली नसून त्यांचे डीएनए राजकोट येथील लॅबमध्ये पाठवून त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
नाशिकमध्ये प्राप्तिकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल 26 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे नाशकात एकच खळबळ उडाली आहे.
'द शेमलेस' चित्रपटासाठी अनसूयाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी आपला पुरस्कार 'क्विअर कम्युनिटी'ला समर्पित केला आहे.
मुंबई गोवा महामार्गावर हॉलिवूड पद्धतीने ट्रकवर दरोडा टाकण्यात आला. ट्रकच्या मागून येणाऱ्या गाडीतल्या ड्रायव्हरने याचा व्हिडीओ काढला असून तो सोशल मीडियावर सगळीकडे ट्रेंडिंगमध्ये आहे.
दिल्ली येथील बेबी केअर सेंटरला आग लागल्यामुळे सात बालकांचा मृत्यू झाला आहे. येथे दोनही बाजूने आग लागल्यामुळे बालकांना वाचवण्यासाठी खिडकी तोडण्यात आली आणि इतर बालकांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले आहे.
लिव्हरपूल येथील रहिवासी असलेल्या 35 वर्षीय महिलेने तिचे सुमारे 41 किलो वजन कमी केले आहे. 41 किलो वजन कमी करणाऱ्या महिलेचे नाव टोनी कॅलँड असून ती 4 मुलांची आई आहे .एक दिवस मुलाने सहज मला मोटी म्हणून हाक मारली त्यानंतर ठरवलं आता वजन कमी करायलाच हवं.
सध्याच्या घडीला केदारनाथ येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी असून भाविकांचा येथे महापूर लोटल्याचे दिसून येत आहे. राजेश साहू या एक्स अकाऊंटवरून टाकलेल्या व्हिडिओमध्ये लांबच लांब रांगा असून त्यामध्ये भाविक दर्शनासाठी उभे असल्याचे दिसून आले आहे.
उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमध्ये भीषण अपघात झाला असून त्यामध्ये 11 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या अपघातात डंपरने बसला धडक देऊन तो परत कोसळल्यामुळे ही घटना घडली आहे.
शनिवारी उशिरा दिल्ली येथे चिल्ड्रेन हॉस्पिटलला आग लागली असून यामध्ये बारा बालकांचा मृत्यू झाला आहे. इतरही अनेक बालक जखमी झाले असून अग्निशामक दलाकडून आग विझवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.