Vanessa Dougnac : भारत सोडण्याबाबत फ्रेंच पत्रकार व्हेनेसे डोगनॅक म्हणाल्या की, ‘भारत देश सोडणे हा त्यांनी स्वीकारलेला पर्याय नव्हता. तर मला भाग पाडले गेले’.
Congress : काँग्रेस पक्षाचे नेते विवेक तन्खा म्हणाले की, या प्रकरणातील आजच्या सुनावणीनंतर कर विभागाने खाती अनलॉक केली आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अबू धाबीमधील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे मंदिराची सध्या जगभरात चर्चा केली जात आहे. मंदिरात भगवान स्वामी नारायण यांची पूजा केली जाते.
तृणमूल कांग्रेस पक्षाच्या खासदार मिमी चक्रवर्ती यांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा मिमीने ममता बॅनर्जी यांच्याकडे सोपविला आहे. वर्ष 2019 मधील लोकसभा निवडणुकीत मिमीला जादवपुर जागेवरुन विजय मिळाला होता.
मुंबईतील बोरिवली येथील एका महिलेने आपल्याच मुलीचा जीव घेतल्याची घटना घडली आहे. खरंतर महिलेने मुलीचा ओढणीने गळा आवळून हत्या केली.
Pradhan Mantri Fasal Bima Yojana : पंतप्रधान पीक विमा योजना वर्ष 2016-17 मध्ये देशभरात सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पीक सुरक्षा आणि पिकाचे नुकसान झाल्यास विम्याची रक्कम दिली जाते.
काँग्रेस पक्षाकडून आयकर विभागासह भाजपवर काही गंभीर आरोप लावले आहेत. आयकर विभागाने काँग्रेस आणि यूथ काँग्रेसची खाती गोठवल्याचा आरोप पक्षाचे सरचिटणीस अजय माकन यांनी केला आहे.
न्यूयॉर्क येथून मुंहईत आलेल्या एका 80 वर्षीय वृद्धाला मुंबई विमानतळावर व्हील चेअर न मिळाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. खरंतर, व्यक्ती आपल्या पत्नीसोबत मुंबईत आला होता.
दिल्लीतील अलीपुर येथील एका पेंट फॅक्टरीला आग लागल्याने 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. याशिवाय पोलिसांकडून आता अधिक तपास केला जात आहे.
संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चा या दोन संघटनांनी या आंदोलकांच्या समर्थनार्थ 16 फेब्रुवारीला ग्रामीण भारत बंदची हाक दिली आहे.