सार

झोमॅटो डिलिव्हरी एजंट महिलेने आपल्या लहान मुलाला सोबत घेऊन बाईक चालवत डिलिव्हरी करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

गुजरातमधील राजकोटमधील एका महिला झोमॅटो डिलिव्हरी एजंटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अनेकांनी पाहिला आहे आणि त्यावर कमेंट्स केल्या आहेत. या व्हिडिओमध्ये विशेष म्हणजे ती आपल्या लहान मुलाला सोबत घेऊन जेवण पोहोचवण्यासाठी जाते.

हा व्हिडिओ vishvid या युजरने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये बाईक चालवणारी महिला आपल्या समोर मुलाला बसवून असल्याचे दिसत आहे. ती हॉटेल मॅनेजमेंटची विद्यार्थिनी असल्याचे तिने व्हिडिओमध्ये सांगितले आहे. पण, बाळाला सोबत घेऊन जाण्याची परवानगी असलेले काम मिळणे कठीण होते. झोमॅटोमध्ये काम करताना तिला हे शक्य झाले. बाळाला सोबत घेऊन कामाला जाता येते. म्हणूनच ती हे काम करते असे ती सांगते.

View post on Instagram