Iran Israel Conflict Sparks LPG Supply : इराणने होरमुझची सामुद्रधुनी बंद केल्यामुळे भारताच्या क्रूड ऑईल आणि एलपीजी आयातीवर संकट आलं आहे. पण, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तूर्तास वाढ होणार नाही, असं केंद्राने स्पष्ट केलं आहे.

Iran Israel Conflict Sparks LPG Supply : इराण आणि इस्रायलमधील संघर्षामुळे देशात एलपीजी वापरासंदर्भात लवकरच काही निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. सध्या तरी देशात गॅसची कोणतीही टंचाई नाही, पण हॉटेल्सना एलपीजी सिलिंडरची कमतरता भासू शकते. तसेच, घरगुती सिलिंडरच्या बुकिंगवरील निर्बंध कायम राहतील, असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. या पार्श्वभूमीवर, देशात गॅसचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी केंद्र सरकारने तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीत तेल कंपन्यांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. सरकार घरगुती सिलिंडरच्या साठेबाजीवरही बारकाईने लक्ष ठेवणार आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

सध्या भारतात एलपीजीची टंचाई नाही आणि इतर देशांमधून एलपीजीचा पुरवठा होईल, असं सरकारचं म्हणणं आहे. मात्र, इंधन पुरवठा थांबल्याने गुजरातमधील काही सिरॅमिक आणि टाइल निर्मिती युनिट्सनी आपलं काम थांबवलं आहे. इराणने होरमुझची सामुद्रधुनी बंद केल्यामुळे भारतासमोर क्रूड ऑईल आणि एलपीजी आयातीचं संकट उभं राहिलं आहे. पण, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तूर्तास कोणतीही वाढ होणार नाही, असं केंद्राने स्पष्ट केलं आहे.

आकडेवारीनुसार, भारताकडे तब्बल आठ आठवडे पुरेल इतका पेट्रोलियम उत्पादनं आणि क्रूड ऑईलचा साठा आहे. त्यामुळे सध्या तरी घाबरण्याचं कारण नाही, असं देशाने स्पष्ट केलं आहे. या संकटावर मात करण्यासाठी अनेक देशांमधून तेलाचे टँकर्स भारताकडे येऊ लागले आहेत. भारताने रशियाकडूनही तेल खरेदी सुरू केली आहे. यामुळे देशात तेलाची उपलब्धता निश्चित करता येईल, असा विश्वास सरकारला वाटतो. दरम्यान, अनेक देशांमध्ये तेलाच्या किमती वाढल्या आहेत. भारत मोठ्या प्रमाणात एलपीजी आणि एलएनजी गॅस कतारकडून आयात करत होता. आता या भागात संकट निर्माण झाल्याने गॅस आयातीबाबत थोडी चिंता व्यक्त केली जात आहे.