सार

दिल्ली दारू धोरण घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेले आम आदमी पार्टीचे ज्येष्ठ नेते मनीष सिसोदिया यांना १७ महिन्यांनी जामीन मंजूर झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज मंजूर केल्याने पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

बऱ्याच दिवसांनी आम आदमी पार्टीसाठी आनंदाची बातमी आली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची सर्वोच्च न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे. दिल्ली दारू धोरण घोटाळ्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होऊन न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला. न्यायालयाच्या निर्णयाने पक्षाचे नेते, कार्यकर्ते तसेच कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

मनीष सिसोदिया यांनी १७ महिने तुरुंगात काढले

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री 17 महिने तुरुंगात आहेत. अनेकवेळा त्यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला पण तो फेटाळण्यात आला. दोन दिवसांपूर्वी जामीन अर्जावर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. या याचिकेवर आज न्यायालयाने निर्णय दिला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाकडून जामीन न मिळाल्याने मनीष सिसोदिया यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता.