सार
उत्तरप्रदेशातील प्रचारावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुन्हेगारांना चांगलीच तंबी दिली असून समाजामध्ये काहीही अनुचित घडल्यास त्यांचा विनाश निश्चित असल्याचे सांगितले आहे. जाणून घ्या नेमके का बोले योगी आदित्यनाथ
उत्तर प्रदेश: लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सगळीकडे सुरु असून उत्तरप्रदेश मध्ये प्रचारावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुन्हेगारांना चांगलीच तंबी दिली आहे. अगदी कठोर शब्दात सांगितले आहे की, समाजातील सुरक्षा धोक्यात आणल्यास त्याचे रॅम नाम सत्य निश्चित आहे.
अलिगडमध्ये भाजपचे लोकसभा उमेदवार सतीश कुमार गौतम यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. सध्या मुली आणि व्यापारी वर्ग मोकळेपणाने बाहेर फिरू शकत आहेत. याचा विचार देखील अनेकांनी केला नव्हता. त्यामुळे मुली आणि व्यावसायिकांच्या सुरक्षेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि राहणार. तसेच यांच्या सुरक्षेत बाधा आणणाऱ्या गुन्हेगारांना संपविण्याचे काम सरकार करेल. कारण दररोज आपण राम नामाचा जप करतो, रामाचे खरे भक्त दुर्जनांवर भारी पडतात आणि त्याचा विनाश निश्चित होतो. त्यामुळे वाईटचे दिवस आता संपले असून गुन्हेगारी मुक्त उत्तर प्रदेश लवकरच होईल, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणले.
ते पुढे बोलताना म्हणाले की, 10 वर्षांपूर्वी जे स्वप्न होते ते आता सत्यात उतरत आहे आणि ते तुमच्या निवडीमुळे घडत आहे. चुकीच्या मतांमुळे देश भ्रष्टचाराच्या आहारी गेला असता. पूर्वी जी अराजकता होती ती आता कुठेही मला दिसत नाही. तसेच मुलींना व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात धोका होता तेही भाजपच्या काळात मला दिसून आलेले नाही. त्यामुळे निरंतर प्रगती आणि विकासासाठी मतदान करणे महत्त्व आहे . असे त्यांनी सांगितले.
संसदेत सर्वाधिक खासदार असलेले राज्य :
उत्तरप्रदेशमधून जवळपास ८० खासदार निवडून जातात. त्यामुळे यंदाच्या लोकसभानिवणुकीचे मतदान सर्व सात टप्प्यांत होणार आहे. यामध्ये 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे, 23 मे आणि 1 जून असे होणार आहे.
आणखी वाचा :
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत? न्यायालयाने काढले अटक वॉरंट...काय आहे आर्म्स ऍक्ट प्रकरण
30 वर्षांखाली असणाऱ्या प्रत्येक अब्जाधिशाला मिळाला संपत्तीचा वारसा, संशोधनात आले समोर कारण