क्लिक हिअर' चा ट्रेंड नेमका काय ? अनेक राजकीय नेत्यांचीही यात उडी

| Published : Mar 31 2024, 10:20 AM IST / Updated: Mar 31 2024, 10:21 AM IST

CLICK HERE

सार

शनिवारी संध्याकाळपासून ट्विटरवर एक फोटो व्हायरल झाला त्यानंतर त्याचे ट्रेंडमध्ये रूपांतरण झाले. या फोटोत पांढऱ्या बॅकग्राउंडवर 'क्लिक हिअर' असं लिहिलेल आहे आणि त्यावर एक बाण दाखवण्यात आला आहे.नेमकं हे प्रकरण काय जाणून घेऊया. 

शनिवारी संध्याकाळपासून ट्विटरवर एक फोटो व्हायरल झाला त्यानंतर त्याचे ट्रेंडमध्ये रूपांतरण झाले. या फोटोत पांढऱ्या बॅकग्राउंडवर 'क्लिक हिअर' असं लिहिलेल आहे आणि त्यावर एक बाण दाखवण्यात आला आहे. फोटोच्या खालच्या डाव्या कोपऱ्यात ALT असं लिहिलेलं आहे. या ऑल्टवर क्लिक केलं की काहीतरी मजकूर वाचायला मिळतो.अनेकांना ऑल्टवर क्लिक करायचं असतं हे माहिती नसल्यामुळे फक्त क्लिक हिअर लिहिलेला फोटो व्हायरल होत आहे.

ऑल्ट टेक्स्ट म्हणजे काय ?

कोणताही फोटो एक्सवर पोस्ट करत असताना त्या फोटोत नेमकं काय आहे हे सांगता यावं यासाठी ऑल्टची सुविधा देण्यात आली आहे .ऑल्ट म्हणजे अल्टर्नेटिव्ह टेक्स्ट. यासाठी 1000 कॅरेक्टर्सची मर्यादा घालून देण्यात आलेली असून याचा वापर करून तुमच्या पोस्टचा आकार न वाढवता फोटोचं व्यवस्थित वर्णन करता येतं. ज्यांना दिसत नाही किंवा ज्यांना वाचता येत नाही अशा लोकांसाठी ही सुविधा करण्यात आलेली असून. अंध व्यक्तींना त्यांच्या मोबाईलवर जो फोटो आला आहे त्यात नेमकं काय आहे, हे व्यवस्थित कळावं म्हणून हे फिचर सुरु करण्यात आलेलं होतं.

ऑल्ट टेक्स्ट कसा वापरतात?

एक्सवर फोटो पोस्ट करत असताना ऑल्ट टेक्स्ट देता येतो.एक्सवर फोटो अपलोड करत असताना तिथे ऑल्टचा पर्याय दिसतो. त्यावर क्लिक केलं की तुम्ही तुमच्या फोटोच्या संदर्भातला कोणताही मजकूर तिथे लिहू करू शकता. त्यानंतर हा मजकूर तुमच्या फोटोसोबत जोडला जाणार आहे. हा फोटो पोस्ट केल्यानंतर जर वापरकर्त्याने ऑल्टया शब्दावर क्लिक केलं तरच त्याला तो मजकूर किंवा संदेश वाचता येईल.

राजकीय पक्षांनीही वापरला 'क्लिक हिअर'चा ट्रेंड

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षदेखील सोशल मीडियावर सक्रिय झाले आहेत. त्यामुळे इंटरनेटवर चालणाऱ्या ट्रेंड्सचा फायदा घेण्यासाठी सगळ्याच पक्षांच्या सोशल मीडिया टीम्स काम करतायत. 'क्लिक हिअर'चा ट्रेंडही त्यांनी सोडला नाही. जवळपास सगळ्याच प्रमुख राजकीय पक्षांनी क्लिक हिअरचा फोटो पोस्ट केला आणि त्यातून प्रचाराचा संदेश नेटकऱ्यांपर्यंत पोहोचवला आहे.

आणखी वाचा :

Lok Sabha Election 2024 : बारामतीत पवार विरुद्ध पवार ;कोण मारणार बाजी वाहिनी की ताई?

10 वर्षाच्या मुलीनं स्वत:च्या वाढदिवसाचा खाल्ला केक अन् गमावला जीव, असं नेमकं काय घडलं?