सार
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कारचा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. या अपघातात ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
Mamta Banerjee Meets With Accident : पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (Trinamool Congress) अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्या कारला अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात ममता बॅनर्जी यांना किरकोळ दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे.
ममता बॅनर्जी यांची कार दुसऱ्या कारला धडकण्याआधीच थांबवल्याने अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. रिपोर्ट्सनुसार, ममता बॅनर्जींच्या कारचा अपघात पश्चिम बंगालमधील वर्धमान (Bardhaman) येथून कोलकाताच्या (Kolkata) दिशेने जाताना घडला आहे.
ममता बॅनर्जींच्या ताफ्यासमोर अचानक दुसरी कार आल्याने त्यांच्या कारला तातडीने ब्रेक लावण्यात आला. बिघडलेल्या वातावरणामुळे ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरऐवजी कारच्या माध्यमातून प्रवास करत होत्या.
अपघातावेळी काय घडले?
एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले की, ममता बॅनर्जी कारमध्ये चालकाच्या बाजूला बसल्या होत्या. अपघात झाल्यानंतर ममता बॅनर्जींचे डोकं कारच्या काचेला आपटले गेल्याने त्यांना दुखापत झाली. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना कोलकाता येथील रुग्णालयात उपचारासाठी देण्यात आले. खरंतर ममता बॅनर्जी एका प्रशासकीय आढावा बैठकीसाठी वर्धमान येथे गेल्या होत्या.
लोकसभा निवडणूकीत TMCची 'एकला चलो रे' ची भुमिका
विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला झटका देत ममता बॅनर्जींनी त्यांचा पक्ष आगामी लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections) राज्यात एकट्याने निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. ममता बॅनर्जींनी काँग्रेस आणि टीएमसीदरम्यान जागा वाटपावरुन सुरू असलेल्या संघर्षामुळे म्हटले की, मी काँग्रेसला जागा वाटपासंदर्भात एक प्रस्ताव दिला होता. पण सुरुवातीपासूनच काँग्रेसने यासाठी नकार दिला. अशातच तृणमूल काँग्रेस पक्षाने बंगालमध्ये एकट्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
आणखी वाचा :
BRICS : भारत-रशिया लवकरच डिजिटल अर्थव्यवस्था तयार करणार, असा पूर्ण होणार अजेंडा
Mynmar Army Aircraft Crashes : लेंगपुई विमानतळावर मान्यमार सैन्याच्या विमानाला अपघात, सहा जण जखमी
Budget 2024 : मोदी सरकारच्या अर्थसंकल्पाकडे शेतकऱ्यांचे लक्ष, कृषी क्षेत्रासाठी या घोषणेची शक्यता