Viral video : गंगा नदीत दूध अर्पण करत असताना, तिथे आलेल्या गरीब मुलांना अडवणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो पाहून संताप व्यक्त केला जात आहे. भक्तीच्या नावाखाली होणाऱ्या या प्रकारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 

Viral video : एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, गाडगे महाराज यांच्यासह सर्वच संतांनी अंधश्रद्धेवर प्रहार करतानाच भूतदया, माणुसकी याच्याबद्दल जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. संतमहात्म्यांनी सर्वांनाच सन्मार्ग दाखविला असला तरी, अद्याप अंधश्रद्धेला, समाजातील गैरसमजांना कवटाळून बसले आहेत. भारताने चांद्रयान -3 मोहीम यशस्वी करून दाखविली. त्याच भारतात माणुसकीच्या दृष्टीने लज्जास्पद घटना घडत आहेत. अशा घटनांबद्दल सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उटमत असल्या तरी, हे प्रकार अद्याप थांबलेले नाहीत, हे दुर्दैव म्हणावे लागेल.

पवित्र गंगा नदीत दूध अर्पण करत असताना, ते दूध गोळा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या गरीब मुलांना अडवून त्यांच्याशी गैरवर्तन करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या वादाला तोंड फुटले आहे. एका प्रसिद्ध पत्रकाराने एक्सवर शेअर केलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

दूध गंगेसाठी, भुकेल्या मुलांसाठी नाही

व्हिडिओमध्ये एक तरुण मोठ्या भांड्यातून गंगा नदीत दूध ओतताना दिसत आहे. यावेळी, नदीत वाहून जाणारे दूध भांड्यात गोळा करण्यासाठी काही मुली तिथे पोहोचल्या. मात्र, मुली येत असल्याचे लक्षात येताच त्या तरुणाने दूध त्यांच्या भांड्यात पडू नये अशा पद्धतीने दूर ओतण्यास सुरुवात केली. दूध गंगेत वाहिले तरी चालेल, पण त्या भुकेल्या मुलांना मिळू नये, अशा हट्टाने तो वागत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे.

Scroll to load tweet…

ही भक्ती नाही, तर ढोंगीपणा

व्हिडिओ व्हायरल होताच तरुणावर जोरदार टीका होऊ लागली. ही अमानुष भक्ती असून, नदीत वाहून जाणारे दूध भुकेल्या मुलांना देणे हेच खरे पुण्यकर्म ठरले असते, असे अनेकांनी लिहिले. देवाला नैवेद्य दाखवतानाच देवाच्याच लेकरांबाबत क्रूरता दाखवणे ही भक्ती नसून ढोंगीपणा आहे, असे सोशल मीडिया युजर्सनी म्हटले आहे. 

या घटनेचे गांभीर्य समजून घेण्यासाठी एका वापरकर्त्याने 'ग्रोक' (Grok) नावाच्या एआय चॅटबॉटची मदत घेतली असता मिळालेले उत्तरही आता चर्चेत आहे. एआयने या दृश्याला एक गंभीर विरोधाभास म्हटले आहे. पवित्र विधी आणि गरिबीचे कठोर वास्तव यांच्यातील संघर्ष हा व्हिडिओ स्पष्ट करतो, असे ग्रोकने म्हटले. अशा सांस्कृतिक प्रथांची समाजात खोलवर मुळे रुजलेली असली तरी, अशी दृश्ये श्रद्धेला व्यावहारिकतेशी जोडून गंभीरपणे विचार करण्यास प्रवृत्त करतात, असेही चॅटबॉटने नमूद केले. श्रद्धा म्हणजे करुणा असेल, तर नैवेद्य निसर्गाला अर्पण करायचा की बाजूला उभ्या असलेल्या भुकेल्या माणसांना? हा प्रश्न या व्हिडिओने पुन्हा एकदा उपस्थित केला आहे.