
अबू असीम आझमींची महाराष्ट्र अर्थसंकल्पावर टीका — "मुस्लिमांना वाटा नाही?"
महाराष्ट्र समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अबू आसिम आझमी यांनी अर्थसंकल्पावर टीका करत सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, सरकारने सादर केलेला हा अर्थसंकल्प “समुद्रातील एका थेंबासारखा” असून, अल्पसंख्याकांना विशेषतः मुस्लिम समाजाला कोणताही ठोस हिस्सा दिलेला नाही.आझमी म्हणाले की, देशभरात अल्पसंख्याकांना विकास प्रक्रियेपासून दूर ठेवले जात आहे आणि बजेटमध्ये मुस्लिमांसाठी कोणतीही ठोस तरतूद दिसत नाही. त्यांनी असा दावा केला की, मुस्लिम समाजाला या बजेटमधून 0.05 टक्केही लाभ मिळालेला नाही.याशिवाय, धर्मांतराच्या मुद्द्यावरही त्यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं की, १८ वर्षांनंतर कोणालाही स्वतःच्या इच्छेने धर्मांतर करण्याचा अधिकार आहे. काही लोक स्वेच्छेने धर्मांतर करतात, मात्र नंतर दबाव टाकून जबरदस्तीचा आरोप केला जातो, असंही त्यांनी सांगितलं.अशाच Maharashtra Politics, Budget Reaction, Minority Issues News साठी Asianet News Marathi ला Subscribe करा.