
इराण-इस्रायल युद्धाचा महाराष्ट्रावर परिणाम? आदित्य ठाकरे यांची PM-CM कडून स्पष्टीकरणाची मागणी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आंतरराष्ट्रीय घडामोडींवरून केंद्र आणि राज्य सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत.इराण-इस्रायल युद्ध आणि पश्चिम आशियातील तणावामुळे हॉर्मुझ सामुद्रधुनीतील परिस्थिती बिघडत असल्याने, त्याचा परिणाम भारतावर आणि विशेषतः महाराष्ट्रावर होऊ शकतो, असं ठाकरे यांनी म्हटलं आहे.त्यांच्या मते, या संघर्षामुळे कच्चा माल, उत्पादनांची आयात आणि LPG गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महागाई वाढू शकते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देश आणि राज्यातील जनतेला या परिस्थितीबद्दल स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी केली. तसेच, सरकार आणि विरोधकांनी एकत्र येऊन चर्चा केली तरच देश पुढे जाऊ शकतो, असंही त्यांनी म्हटलं.