सार

Dibrugarh Express Train Derail : उत्तर प्रदेशातील गोंडा येथे चंदीगड येथून निघालेल्या दिब्रूगड एक्स्प्रेसच्या 10 ते 12 बोगी पटरीवरुन घसरल्या आहेत.

 

Dibrugarh Express Train Derail : उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात चंदीगडहून दिब्रुगडला जाणाऱ्या रेल्वेचा भीषण अपघात झाला. या अपघातमध्ये 10 डबे रुळावरून घसरल्याचे समोर आलेय. या अपघातमध्ये आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आलेय. तर 20 जण जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळावर बचावकार्य सुरु आहे.

घटनास्थळावर मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे. जवळपास 40 सदस्यीय वैद्यकीय पथक आणि 15 रुग्णवाहिका घटनास्थळी उपस्थित आहेत. या दुर्दैवी घटनेच्या संदर्भात हेल्पलाइन क्रमांक 8957400965 आणि 8957409292 सरकारकडून जारी करण्यात आला आहे.

ईशान्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी पंकज कुमार सिंह यांनी या घटनेबाबात माहिती दिली. ते म्हणाले की, चंदीगडहून दिब्रुगडला जाणाऱ्या चंदीगड-दिब्रूगड एक्स्प्रेसचे अनेक डबे रुळावरुन खाली घसरले. गोंडा-गोरखपूर रेल्वे सेक्शनवरील मोतीगंज आणि झिलाही रेल्वे स्थानकांदरम्यान गुरुवारी दुपारी हा अपघात झाला. मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. अपघातामुळे संबंधित रेल्वे विभागावरील कटिहार-अमृतसर एक्स्प्रेस आणि गुवाहाटी-श्रीमाता वैष्णोदेवी कटरा एक्स्प्रेस अन्य मार्गावर वळवण्यात येत आहेत.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोंडा जिल्ह्यातील रेल्वे अपघाताची दखल घेतली आहे. योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी पोहोचून मदतकार्य वेगाने करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याशिवाय अपघातातील जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

अपघाताची माहिती मिळताच रेल्वेचे सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून या अपघात प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. रेल्वे अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे अद्याप वृत्त नाही. गोरखपूर रेल्वे सेक्शनच्या मोतीगंज सीमेजवळ जिलाही दरम्यान एक्स्प्रेस रेल्वेचा हा अपघात झाला.

सीएम योगी आदित्यनाथ यांच्याकडून मदतकार्य करण्याचे निर्देश

दिब्रूगड एक्स्प्रेसच्या अपघाताची माहिती मिळताच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुख्य सचिव आणि डीजीपी यांच्यासोबत याबाबत चर्चा केली. त्यासोबतच अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्याला गती देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्‍यांकडून करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर आजूबाजुच्या जिल्ह्यातील सर्व रुग्णालये, सीएचसी, प्राथमिक आरोग्य केंद्रांना अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे. एसडीआरएफच्या टीमलाही घटनास्थळी पोहोचून मदतकार्याला गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आणखी वाचा :

‘लाडका भाऊ योजने’साठी कसा कराल अर्ज?, जाणून घ्या दरमहा किती रुपये मिळणार?

पुण्यात Zika Virusचा गर्भवती महिलांना सर्वाधिक धोका, प्रशासन हाय अ‍ॅलर्ट मोडवर

मुंबईसह कोकण किनापट्टीत 200 ते 500 मिमी पाऊस पडणार, हवामान खात्याचा इशारा