पीलीभीत लोकसभेचे वरून गांधींच्या ऐवजी ऊत्तर प्रदेशचे मंत्री जितिन प्रसाद यांना तिकीट जाहीर, वरून गांधी कोणता निर्णय घेणार?

| Published : Mar 25 2024, 11:58 AM IST

Varun Gandhi

सार

खासदार वरून गांधी यांना भाजपकडून परत लोकसभेचे तिकीट दिले जाणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात होती. ती शक्यता अखेर खरी ठरली आहे. उत्तर प्रदेश सरकारमध्ये मंत्री असलेले जितीन प्रसाद यांना भाजपकडून लोकसभेचे तिकीट दिले आहे.

खासदार वरून गांधी यांना भाजपकडून परत लोकसभेचे तिकीट दिले जाणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात होती. ती शक्यता अखेर खरी ठरली आहे. उत्तर प्रदेश सरकारमध्ये मंत्री असलेले जितीन प्रसाद यांना भाजपकडून लोकसभेचे तिकीट दिले आहे. त्यांना पिलिभीत या वरून गांधी यांच्या लोकसभा मतदारसंघाचे लोकसभेचे तिकीट जाहीर करण्यात आले.

पिलिभीत या लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व गांधी घराण्याच्या आई आणि मुलगा यांनी दोन दशकांहून अधिक काळ त्याचे प्रतिनिधित्व केले आहे. वरून गांधी यांना तिकीट दिले गेले नसले तरी त्यांच्या आई मनेका गांधी यांना तिकीट जाहीर करण्यात आले आहे. त्यांना सुलतानपूर येथून लोकसभेचे तिकीट जाहीर करण्यात आले आहे. 

पिलिभीत येथून वरून गांधींच्याऐवजी पीलीभीत येथून उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री जितिन प्रसाद यांना तिकीट 
दोन वर्षांपूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले उत्तर प्रदेशचे मंत्री जितिन प्रसाद यांना आज वरुण गांधींच्या जागी पिलीभीत लोकसभा मतदारसंघासाठी भाजपचे उमेदवार म्हणून नाव देण्यात आले. पिलीभीतचे प्रतिनिधित्व वरुण गांधी यांच्या आई मनेका गांधी किंवा त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ केले आहे.

वरुण गांधी यांनी 2009 मध्ये त्यांच्या पदार्पणाच्या लढतीत 4.19 लाख मतांनी पिलीभीत निर्णायकपणे जिंकले. 2014 आणि 2019 मधील त्यांच्या विजयांनी कुटुंबाचे राजकीय वर्चस्व आणखी मजबूत केले. त्यामुळे यावेळी वरून गांधी यांना तिकीट न दिल्यामुळे ते कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. 
आणखी वाचा - 
होळी सणाला कुत्र्यांवर होणाऱ्या अत्याचारावर अभिनेत्री श्रद्धा कपूर संतप्त, दोषींच्या विरोधात कार्यवाही करण्याची केली मागणी
दादरमध्ये एका व्यक्तीने केले गैरवर्तन, प्रिया बापटचा धक्कादायक खुलासा; नेमकं प्रकरण काय वाचा सविस्तर