UPSC Result : यंदा मात्र मुलांनी मारली बाजी ; आदित्य श्रीवास्तव देशात पहिला, तर अनिमेश प्रधान दुसऱ्या क्रमांकावर

| Published : Apr 16 2024, 04:14 PM IST / Updated: Apr 16 2024, 05:11 PM IST

UPSC topper Aditya Srivastava

सार

केंद्रीय लोकसेवा आयोगाने विविध पदांसाठी २०२३ साली घेतलेल्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत.गेल्या दोन परीक्षांमध्ये यूपीएससीचे पहिले तीन क्रमांक मुलींनीच पटकावल्याचं दिसून आलं होतं. यंदा मात्र मुलांनी बाजी मारली आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगा परीक्षेचे निकाल जाहीर झाले असून आदित्य श्रीवास्तव देशात पहिला तर अनिमेश प्रधान देशात दुसरा आला आहे. गेल्या दोन परीक्षांमध्ये यूपीएससीचे पहिले तीन क्रमांक मुलींनीच पटकावल्याचं दिसून आलं आहे. यंदा मात्र मुलांनी बाजी मारली दिसतेय.तर देशात तिसऱ्या क्रमांकावर डोनुरू अनन्या रेड्डी आहे. 2023 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षांचे हे निकाल असून upsconline.nic.in आणि upsc.gov.in या संकेतस्थळांवर सविस्तर निकाल पाहाता येईल.

1016 उमेदवार झाले UPSC उत्तीर्ण!

यंदा यूपीएससीच्या परीक्षांमध्ये 1016 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 347 उमेदवार खुल्या प्रवर्गाचे, 116 उमेदवार आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे, 303 उमेदवार ओबीसी प्रवर्गाचे, 165 उमेदवार अनुसूचित जाती प्रवर्गाचे तर 86 उमेदवार अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आहेत.

2021 व 2022 मध्ये मुलींनी पटकावला होता अव्वल क्रमांक

2021मध्ये झालेल्या परीक्षांमध्ये श्रुती शर्मानं UPSC परीक्षांमध्ये देशात पहिला क्रमांक पटकावला होता, तर अंकिता अग्रवाल व जेमिनी सिंगला यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला होता. पाठोपाठ 2022 मध्ये झालेल्या परीक्षांमध्येही तोच कित्ता गिरवला गेला. इशिता किशोरनं देशात पहिला, गरिमा लोहियानं देशात दुसरा, उमा हराथीनं देशात तिसरा तर स्मृती मिश्रानं देशात चौथा क्रमांक पटकावला होता.

कोणत्या गटांसाठी पदभरती :

आयएएस अर्थात भारतीय प्रशासकीय सेवा, आयपीएस अर्थात भारतीय पोलीस सेवा, आयएफएस अर्थात भारतीय परराष्ट्र सेवा व गट अ आणि गट ब मधील इतर केंद्रीय सेवांसाठी ही पदभरती करण्यात येणार आहे.

निकाल कुठे पाहायचा ?

upsc.gov.in या संकेतस्थळावर UPSC CSE Results या लिंकवर क्लिक करा. आपले लॉगइन डिटेल्स इथे भरा. तुमचा निकाल स्क्रीनवर दिसू लागेल. निकालपत्र डाऊनलोड करण्याचाही पर्याय इथे देण्यात आला आहे.

यूपीएससी CSE 2023 टॉपर्स लिस्ट :

  1. आदित्य श्रीवास्तव
  2. अनिमेष प्रधान
  3. डोनुरु अनन्या रेड्डी
  4. पी के सिद्धार्थ रामकुमार
  5. रुहानी
  6. सृष्टि डबास
  7. अनमोल राठौड़
  8. आशीष कुमार
  9. नौशीन
  10. ऐश्वर्यम् प्रजापति

आणखी वाचा :

Loksabha Elections 2024 - देशाच्या जनतेला 2047 मध्ये भारत विकसित झालेला पाहायचाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये केली घोषणा

सरबजीत हत्येमागे भारताचा हात? पुराव्याशिवाय पाकिस्तानने केला थयथयाट

गुजरातच्या व्यावसायिक दाम्पत्यानं जैन भिक्षूक होण्यासाठी दान केली २०० कोटींची संपत्ती