गुजरातच्या व्यावसायिक दाम्पत्यानं जैन भिक्षूक होण्यासाठी दान केली २०० कोटींची संपत्ती

| Published : Apr 15 2024, 06:34 PM IST

Bhavesh Bhandari

सार

गुजरातच्या हिम्मतनगर भागात राहणाऱ्या व्यावसायिक दाम्पत्याने जैन भिक्षूक होण्यासाठी आपल्या बांधकाम व्यवसायाचा पसारा गुंडाळला असून १९ वर्षीय मुलगा आणि १६ वर्षांच्या मुलीप्रमाणेच जैन साधू होण्याचा निर्णय घेतला.

गुजरातमधील हिम्मतनगर येथे राहणाऱ्या एका व्यावसायिक दाम्पत्याने आपल्या सर्व संपत्तीचा त्याग करून भिक्षूक होण्याचा निर्णय घेतला आहे. या दाम्पत्याने तब्बल २०० कोटींची संपत्ती दान करून जैन धर्मातील आध्यात्मिक मार्ग निवडला आहे. भावेश भंडारी आणि त्यांच्या पत्नीने फेब्रुवारी महिन्यात सर्व धनसंपत्तीचा त्याग करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता त्यांनी अधिकृतरित्या सर्व भौतिक सुखांचा त्याग केला आहे.

याधीही दोन्ही मुलांनी घेतला आहे सन्यास :

विशेष म्हणजे भंडारी दाम्पत्याच्या दोन्ही मुलांनी २०२२ साली भिक्षूक होण्याचा निर्णय घेतला होता. आपल्या मुलांच्या पावलावर पाऊल टाकत आता भंडारी दाम्पत्यही सर्व त्यागून आध्यात्मिक मार्गावर चालू पडले आहे. भावेश भंडारी यांच्या समाजातील लोकांनी सांगितले की, भंडारी दाम्पत्याच्या मुलांनी भौतिक आसक्तीचा त्याग करून धार्मिक मार्गावर चालण्याची विनंती केल्यानंतर आई-वडिलांनी हे पाऊल उचलले.

२२ एप्रिल रोजी घेणार संन्यासाची शपथ :

२२ एप्रिल रोजी आता सन्यांशी होण्याची शपथ घेतल्यानंतर दाम्पत्याला आपले वैवाहिक संबंध सोडून सर्व भौतिक सुखांचा कायमचा त्याग करावा लागणार आहे. यापुढे ते भारतभर अनवाणी फिरतील आणि या काळात केवळ भिक्षेवर जगतील. भिक्षूक झाल्यानंतर दाम्पत्याला केवळ दोन पांढरी वस्त्रे, भिक्षेसाठी एक वाटी आणि ‘राजारोहण’ बाळगता येईल. जैन साधूकडे बसताना जमीन झाडण्यासाठी जो एक प्रकारचा झाडू असतो, त्याला राजारोहण म्हणतात. बसण्याच्या जागेवरील किटक बाजूला सारून बसण्यासाठी याचा वापर होतो. यातून अहिंसक मार्गाचा अवलंब केला जातो.

घरी अफाट संपत्ती तरीही त्याग का ?

अफाट संपत्ती असूनही त्याचा सहजपणे त्याग केल्यामुळे भंडारी कुटुंब राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे. भवरलाल जैन यांनीही याआधी कोट्यवधी संपत्तीचा त्याग करून धर्माच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला होता, त्याचीच री आता भंडारी कुटुंबाने ओढली आहे. भवरलाल जैन यांनी भारतात सूक्ष्म सिंचनाच्या प्रणालीचा पाया रचला होता. भंडारी दाम्पत्यांसह ३५ जणांची नुकतीच चार किमींची मिरवणूक काढली. या मिरवणुकीत त्यांनी आपले मोबाइल फोन आणि इतर वस्तू दान केल्या. या मिरवणुकीतील रथात भंडारी दाम्पत्य राजेशाही कपड्यांमध्ये बसलेले दिसत आहे.

आणखी वाचा :

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काढले वादग्रस्त बोल, ते समुद्रात पूजा करतात जिथे मंदिर नाही

सिडनीमध्ये चर्च सेवेदरम्यान बिशपवर अनेक वार केले, धक्कादायक व्हिडीओ पाहून व्हाल हैराण