सार
सरबजीत सिंगची हत्या करणाऱ्याच्या हत्येत दिल्लीचा समावेश असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पण या दाव्यांचे समर्थन करण्यासाठी पण कोणतेही पुरावे देण्यात आलेले नाहीत.
सरबजीत सिंगची हत्या करणाऱ्याच्या हत्येत दिल्लीचा समावेश असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पण या दाव्यांचे समर्थन करण्यासाठी पण कोणतेही पुरावे देण्यात आलेले नाहीत. असे आरोप पाकिस्तानच्या वतीने भारतावर करण्यात आलेले आहेत. इस्लामाबादने भारतीय कैदी सरबजीत सिंगच्या हत्येप्रकरणी निर्दोष सुटलेल्या अमीर सरफराजच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप केला आहे. या दाव्याचे समर्थन करण्यासाठी पाकिस्तानकडून कोणतेही पुरावे देण्यात आले नाहीत.
पाकिस्तानचे मंत्री काय म्हणाले?
दोन मोटारसायकलवरून आलेल्या व्यक्तींनी हल्ला केला होता. त्यावर बोलताना पाकिस्तानच्या मंत्र्यांनी म्हटले आहे की, "पाकिस्तानच्या भूमीवर झालेल्या चार हत्यांमध्ये भारताचा समावेश आहे. आम्ही निष्कर्षांची वाट पाहत असून त्यानंतर निर्णय घेणार असल्याचं त्यांनी म्हटले आहे. भारताने पाकिस्तानच्या या आरोपांना अजूनही उत्तर दिलेलं नाही.
पोलिसांनी काय माहिती दिली?
हल्लेखोर जेव्हा हल्ला करायला आले तेव्हा तांबावर लाहोरच्या इस्लामपूरा येथील निवासस्थानी हल्लेखोर होता. त्याच्यावर येथे हल्लेखोरांनी गोळ्या झाडून त्याची हत्या केली. त्यानंतर त्याचा रुग्णालयात नेल्यानंतर मृत्यू झाला. तांबाचा भाऊ जुनैद सरफराज याच्या तक्रारीवरून दोन अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनीच हल्ला केल्याची माहिती देण्यात आली आहे.
डिसेंबर 2018 मध्ये तांबाला लाहोर न्यायालयाने निर्दोष सुटका केली होती. साक्षीदारांनी माघार घेतल्यामुळे त्याची सुटका करण्यात आली होती. तांबाचे हाफिज साईडसोबत जवळचे संबंध असल्याची माहिती देण्यात आली आहे. पाकिस्तानच्या या भूमिकेवर भारत कोणती भूमिका घेईल याकडे आता जगाचे लक्ष लागून राहिलेलं आहे.
आणखी वाचा -
इस्रायलमधील ही 5 जण ठरवणार इराणवर कधी आणि कसा करायचा हल्ला....जाणून घ्या नेतन्याहूंच्या वॉर कॅबिनेटबद्दल सविस्तर
नास्त्रेदेमसची भविष्यवाणी खरी ठरते आहे का ? काय केली होती त्याने भविष्यवाणी जाणून घ्या...