पश्चिम बंगालनंतर आता मुंबईत राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवली जात असून, शिंदे सेनेच्या 'ऑपरेशन टायगर'मुळे उद्धव ठाकरे गटात भीतीचे वातावरण आहे. ठाकरे गटाचे ९ पैकी ६ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात असल्याने, उद्धव ठाकरे यांनी खासदारांची तातडीची बैठक बोलावली आहे.

पश्चिम बंगालमध्ये राजकीय भूकंप आला आहे. आता या भूकंपाचे केंद्र मुंबईकडे हलण्याची भीती व्यक्त केली आहे. ऑपरेशन टायगरमुळे उद्धव ठाकरे गटात मोठी भीती निर्माण झाली आहे. शिंदे सेनेचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि आमदार निलेश राणे यांनी वक्तव्य केल्यामुळं सगळीकडं शिवसेना फुटते कि काय अशीच धास्ती निर्माण झाली आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

मातोश्रीवर खासदारांची बोलावली बैठक 

मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या खासदारांची रविवार १४ जून रोजी बैठक बोलावली आहे. मागीलवेळी परभणीचे खासदार संजय जाधव हे उपस्थित नव्हते, यावेळी कोण उपस्थित राहत नाही याकडं सर्वांचं लक्ष लागून राहील आहे. सध्या ठाकरे गटाचे ९ खासदार असून त्यातील ६ खासदार हे शिंदे सेनेच्या संपर्कात असल्याचं सांगण्यात आलं आहे.

मराठवाड्यातील तीन खासदार संपर्कात 

मराठवाड्यातील ठाकरे सेनेचे तीन खासदार हे शिंदे सेनेच्या संपर्कात असल्याचं सांगण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी परभणीचे खासदार संजय जाधव यांनी एका कार्यक्रमात याविषयीचे मोठे वक्तव्य केले होते. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दौऱ्याच्या वेळेला खासदार ओमराजे निंबाळकर हे उपस्थित राहिले नव्हते.

हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकरही होते अनुपस्थितीत 

हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकरही अनुपस्थितीत राहिले होते. खासदार शिंदे सेनेच्या गळाला ६ ते ७ खासदार लागल्याचं सांगण्यात आलं आहे. यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 7 जून रोजी या खासदारांसोबत दिल्लीत बैठक केल्याचा दावाही करण्यात येतो. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी ऑपरेशन टायगर हे जवळपास पूर्णत्वाच्या दिशेने आहे. ते लवकरच पूर्ण होईल. आमचे नेते एकनाथ शिंदे हे त्यासाठीचा मुहूर्त लवकरच निश्चित करतील असं म्हटलं आहे.

उद्धव सेनेचे खासदार कोण आहेत? 

ओमराजे निंबाळकर, धाराशिव

संजय जाधव, परभणी

नागेश पाटील-आष्टीकर, हिंगोली

संजय देशमुख, यवतमाळ

भाऊसाहेब वाकचौरे, शिर्डी

राजाभाऊ वाजे, नाशिक

अरविंद सावंत, दक्षिण मुंबई

अनिल देसाई, दक्षिण-मध्य मुंबई

संजय दीना पाटील, उत्तर पूर्व मुंबई