बिहारच्या जहानाबादमधील एका सरकारी शाळेत दोन शिक्षक आक्षेपार्ह स्थितीत आढळल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या धक्कादायक घटनेनंतर बिहार शिक्षण विभागाने तात्काळ कारवाई करत दोघांनाही निलंबित केले आहे.
बिहारच्या जहानाबाद जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका सरकारी शाळेच्या आवारात दोन शिक्षक आक्षेपार्ह स्थितीत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओनंतर बिहार शिक्षण विभागाने तातडीने अॅक्शन घेतली आहे. 'लोकमत न्यूज हिंदी' आणि स्थानिक शिक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिडिओ समोर आल्यावर अवघ्या काही तासांतच प्रशासनाने कडक पावले उचलली.
नेमका वाद काय आहे?
ही घटना जहानाबाद जिल्ह्यातील मखदुमपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मच्छिल गावच्या सरकारी मिडल स्कूलमधली आहे. शाळेच्या वेळेतच एका व्यक्तीने या पुरुष आणि महिला शिक्षकाचा मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्ड केला. शाळेच्या गच्चीवर जाणाऱ्या आतल्या पायऱ्यांवर हा सगळा प्रकार घडला.
येथे पाहा व्हिडिओ!
प्रशासनाने काय कारवाई केली?
"हा व्हिडिओ आमच्या निदर्शनास येताच विभागाने त्वरित दखल घेतली," अशी माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी (DPO आस्थापना) रमेश कुमार पाल यांनी दिली.
या दोन्ही शिक्षकांना निलंबित करण्यात आलं आहे. जोपर्यंत या प्रकरणाची अधिकृत चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत त्यांना कामावर रुजू होता येणार नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या घटनेची सविस्तर विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिल्याचेही रमेश कुमार पाल यांनी स्पष्ट केले.
नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया!
एका युजरने संताप व्यक्त करत लिहिलंय, "मुलांना शिक्षण देणाऱ्या मंदिरातही हे लोक आपली लाज आणि मर्यादा विसरले, यांची खरंच कीव येते."
दुसऱ्या एकाने लिहिलंय, "निर्लज्ज कुठले.. हे मुलांना काय शिकवणार? यांना जराही लाज वाटत नाही."
आणखी एकाने कमेंट केलीय की, "हे शिक्षक असू शकतात, यावर माझा विश्वासच बसत नाहीये."
एकाने पुढे लिहिलंय, "














