- Home
- India
- Bisleri Owner : ३२०० कोटींचं बिसलेरी साम्राज्य चालवतात रमेश चौहान आणि जयंती चौहान! वाचा सक्सेस स्टोरी
Bisleri Owner : ३२०० कोटींचं बिसलेरी साम्राज्य चालवतात रमेश चौहान आणि जयंती चौहान! वाचा सक्सेस स्टोरी
बिसलेरी: नुकतंच भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाच्या (FSSAI) नोटीसमुळे चर्चेत आलेली बिसलेरी कंपनी नेमकी कुणाची आहे? या ३२०० कोटींच्या बिझनेस एम्पायरमागे बाप-लेकीची जोडी कशी काम करते, जाणून घ्या.

बिसलेरी पाणी पुन्हा चर्चेत
भारतातील सर्वात लोकप्रिय पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर ब्रँड्समध्ये बिसलेरीचं नाव सगळ्यात वर येतं. या ब्रँडची क्रेझ इतकी आहे की बाजारात बिसलेरीसारख्याच दिसणाऱ्या अनेक फेक बाटल्याही मिळतात. पण अलीकडेच बिसलेरी एका मोठ्या वादामुळे चर्चेत आली. या पाण्याचं सुरक्षिततेबद्दलच्या एका मोठ्या अपडेटमुळे हा वाद निर्माण झाला आहे.

FSSAI ची नोटीस.. कंपनीचं स्पष्टीकरण
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (FSSAI) बिसलेरी इंटरनॅशनलच्या एका पाण्याचा नमुना असुरक्षित असल्याचं आढळल्यानंतर कंपनीवर कारवाईला परवानगी दिली. या घटनेमुळे चौहान कुटुंबाच्या मालकीच्या या कंपनीकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं.
आता ही कंपनी नेमकी कुणाची आहे आणि तिचे मालक कोण आहेत, हे जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे. दुसरीकडे, बिसलेरीने लॅबचे अहवाल फेटाळून लावले. कंपनीने म्हटलं आहे की, नंतर करण्यात आलेल्या स्वतंत्र चाचण्यांमध्ये ब्रोमेटची पातळी विहित मर्यादेत आढळली असून त्यांचं पाणी पिण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे.
बिसलेरीचे खरे मालक कोण?
३,२०० कोटींची उलाढाल असणारी बिसलेरी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी प्रसिद्ध चौहान कुटुंबाच्या मालकीची आहे. रमेश चौहान आणि त्यांची मुलगी जयंती चौहान हे दोघे या कंपनीचं कामकाज पाहण्यात मुख्य भूमिका बजावतात. १९६९ मध्ये रमेश चौहान यांनी हा इटालियन ब्रँड भारतात आणला होता.
तेव्हापासून ते कंपनीचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. ते कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती आहेत. रमेश चौहान यांच्या पत्नी जैनब चौहान याही संचालक मंडळात असून त्या कंपनीच्या संचालक म्हणून काम पाहतात.
जयंतीने टाटांचा करार थांबवला आणि सूत्रं हाती घेतली
२०२२ मध्ये जयंती चौहान यांच्या नेतृत्वाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्यावेळी बिसलेरी कंपनी विकण्यासाठी टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्ससोबत चर्चा सुरू असल्याची बातमी आली होती. मात्र, जयंती यांनी स्वतः पुढाकार घेत कंपनीची सूत्रं हाती घेण्याचा निर्णय घेतला. यामुळे कंपनीच्या उत्तराधिकाराची योजना बदलली. त्यांनी हा प्रतिष्ठित ब्रँड दुसऱ्याच्या हाती जाऊ न देता चौहान कुटुंबातच ठेवण्याचा मोठा निर्णय घेतला. तेव्हापासून त्या कंपनीचं यशस्वीपणे नेतृत्व करत आहेत.
जयंती चौहान, बिसलेरीच्या नव्या पिढीची नेत्या
रमेश आणि जैनब चौहान यांची मुलगी जयंती चौहान सध्या बिसलेरी इंटरनॅशनलच्या उपाध्यक्ष म्हणून काम करत आहेत. त्यांचे वडील रमेश चौहान यांनी हा ब्रँड घराघरात पोहोचवला, तर आता जयंती हा वारसा पुढे नेत आहेत. त्या कंपनीचे ऑपरेशन्स, मार्केटिंग आणि बिझनेस एक्स्पांशन यासारख्या महत्त्वाच्या विभागांवर लक्ष ठेवतात.

