सार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स तुम्हाला मिळणार आहेत.
पावसाळी अधिवेशनाचा गुरुवारी पहिला दिवस प्रचंड गाजतोय. याचे कारण ठरतेय दोन बड्या नेत्यांची भेट. हे दोन नेते आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. विधानभवनाच्या लिफ्टमध्ये हे दोन नेते योगायोगाने एकत्र आले. परिस्थिती ओळखून दोघंही एकमेकांशी सौहार्दानं बोलले. मात्र राजकीय वर्तुळात आणि तज्ज्ञांमध्ये लगेचच चर्चांना उधाण आले आहे. आता या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. त्यांची लिफ्ट सहाव्या मजल्यापर्यंत (मंत्रालयाचा सहावा मजल्यावर मुख्यमंत्र्यांचे दालन आहे) पोहोचू शकत नाही, असा टोला लगावला आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
२०१९ मधील विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर मुख्यमंत्रिपदावरून विवाद होऊन युती तुटल्यापासून एकमेकांवर जहरी टीका करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गुरुवारी विधान भवनाच्या आवारात भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अनौपचारिक संवादही झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
इमरजन्सी अर्थात आणीबाणी हा भारताच्या संविधानावर सर्वात मोठा प्रहार होता. 1975 मध्ये जेव्हा आणीबाणीची घोषणा करण्यात आली, तेव्हा देशात हाहाकार माजला होता. तेव्हा लोकशाही नष्ट करण्याचे प्रयत्नही झाले, असे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी आपल्या अभिभाषणात म्हटले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी दोन्ही सभागृहांच्या संयुक्त सत्राला संबोधित केले.
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला काल मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत विधवा महिलांना दिलासा देण्यासह मंत्रिमंडळाकडून सात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये मुंबई मेट्रो-३ बाबतच्या निर्णयाचाही समावेश आहे.
5. असदुद्दीन ओवैसींची खासदारकी रद्द करण्यासाठी नवनीत राणा आक्रमक, राष्ट्रपतींना लिहिले पत्र
एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी घेतलेल्या शपथविधीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता खासदार ओवैसींच्या या शपथविधीच्या व्हिडिओवरुन त्यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी केली जात आहे. माजी खासदार नवनीत राणा यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून ही मागणी केली आहे. तसेच, ओवैसींकडून भारतीय संविधानाचे उल्लंघन झाल्याचंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे.
6. भाजपाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी दिल्लीतील AIIMS रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची माहिती
भाजपाचे वरिष्ठ नेते आणि माजी उप-पंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, अडवाणी यांना आरोग्यासंबंधित समस्यांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या अडवाणी यांच्यावर जिरियाट्रिक डिपार्टमेंटमधील डॉक्टरांच्या निगराणी खाली ठेवण्यात आले आहे.
बॉलिवूडमधील अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि साउथ सिनेमातील सुपरस्टार प्रभासचा बहुप्रतिक्षीत कल्कि 2898 एडी सिनेमा 27 जूनला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. सिनेमा पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. बहुतांशजणांनी सिनेमा मास्टरपीस असल्याचे म्हटले आहे. सिनेमा प्रदर्शित होण्याआधी त्याची दमदार अॅडव्हान्स बुकिंग करण्यात आले होते.
राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर काही भागात अद्यापही चांगला पाऊस झालेला नाही. काही भागातील शेतकरी पेरणीसाठी चांगल्या पावसाची वाट बघत आहेत. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारीही राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुरुवारी राज्यातील काही भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट तर काही भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
9. T20 WC 2024, Semi finals, IND vs ENG : भारतीय संघ 2022 च्या पराभवाचा बदला घेणार, आज इंग्लंडशी भिडणार
आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2024 मधील दुसऱ्या उपांत्या फेरीतील सामना भारत विरुद्ध इंग्लंडच्या संघासोबत 27 जूनला होणार आहे. दोन्ही संघातील सामना प्रोविडेंस स्टेडिअम, गुयाना येथे रंगणार असून भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजल्यापासून पाहता येणार आहे. आतापर्यंत भारतीय संघाने टी20 वर्ल्ड कपमध्ये दमदार खेळी केल्याचे दिसून आले आहे. याशिवाय भारतीय संघाचा एकही सामन्यात पराभव अद्याप झालेला नाही.
10. NEET पेपर लीक प्रकरणी CBI ने मनीष प्रकाश आणि आशुतोष कुमार यांना पाटणा येथून केली अटक
केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने NEET पेपर लीक प्रकरणात पहिली अटक केली असून, मनीष प्रकाश आणि आशुतोष कुमार यांना चौकशीसाठी बोलावल्यानंतर त्यांना अटक केली आहे. मनीषच्या अटकेची अधिकृत माहिती प्रकाशच्या पत्नीला फोनवरून कळवण्यात आली.