सार

Parliament Session 2024 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज दोन्ही सभागृहांच्या संयुक्त सत्राला संबोधित केले. यावेळी त्यांनी आपल्या लोकशाहीला हानी पोहोचवण्याच्या प्रत्येक प्रयत्नाचा सर्वांनी निषेध करायला हवा असे प्रतिपादन केले.

Parliament Session 2024 : इमरजन्सी अर्थात आणीबाणी हा भारताच्या संविधानावर सर्वात मोठा प्रहार होता. 1975 मध्ये जेव्हा आणीबाणीची घोषणा करण्यात आली, तेव्हा देशात हाहाकार माजला होता. तेव्हा लोकशाही नष्ट करण्याचे प्रयत्नही झाले, असे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी आपल्या अभिभाषणात म्हटले आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज दोन्ही सभागृहांच्या संयुक्त सत्राला संबोधित केले. त्या पुढे म्हणाल्या, आपल्या लोकशाहीला हानी पोहोचवण्याच्या प्रत्येक प्रयत्नाचा सर्वांनी निषेध करायला हवा. फुटीरतावादी शक्ती, लोकशाही कमकुवत करण्याचा आणि देशांत तसेच देशाबाहेरूनही समाजात फूट पाडण्याचे कारस्थान आखत आहेत.

 

 

'तेव्हा संपूर्ण देश अंधरात बुडाला होता' 

राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या, "आणीबाणी हा संविधानावरील हल्ल्याचा सर्वात मोठा आणि काळा अध्याय होता. आणीबाणीदरम्यान संपूर्ण देश अंधारात बुडाला होता. मात्र देश अशा असंवैधानिक शक्तींचा पराभव करण्यात यशस्वी ठरला."

आणखी वाचा :

Maharashtra Assembly Monsoon Session 2024 : विधान भवनात एकाच लिफ्टमधून प्रवास, ठाकरे-फडणवीसांचे मनोमिलन चर्चेला उधाण