लाडकी बहिण योजनेवरून राजकीय घमासान सुरू, वाचा 17 ऑगस्टच्या टॉप 10 बातम्या

| Published : Aug 17 2024, 08:29 PM IST

top 10 news today

सार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिण योजनेचा शुभारंभ केला असून विरोधकांकडून टीका होत आहे. संजय राऊत यांनी या योजनेला निवडणुकीचा जुमला म्हटले आहे.
  1. खोडा घालायला आलेल्या सावत्र भावांना संधी येईल तेव्हा जोडा दाखवा : सीएम शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी बहिणींना उद्देशून भाषण केले आणि विरोधकांवर टीका केली.

2. लाडकी बहिण योजनेवरून संजय राऊतांचा हल्लाबोल, श्रीकांत शिंदेंना म्हटलं 'बेशर्म'

संजय राऊत यांनी लाडकी बहिण योजनेवरून सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. त्यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला आहे.

3. 'एकातरी बहिणीचा अर्ज रद्द करून दाखवा', सुप्रिया सुळेंचा सत्ताधार्‍यांना टोला

लाडकी बहीण योजनेवरून राजकीय वातावरण तापले. विरोधीपक्ष या योजनेला निवडणुकीचा जुमला म्हणत टीका करत आहेत तर सत्ताधारी पक्ष या योजनेचे समर्थन करत आहेत. या दरम्यान सुप्रिया सुळे यांनी या योजनेवरून सत्ताधार्‍यांना टोला लगावला आहे.

4. महाराष्ट्रात 'परीक्षा' पुढे ढकलली?, अमोल कोल्हे यांचा सरकारवर गंभीर आरोप

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी महाराष्ट्र सरकारवर निवडणूक पुढे ढकलल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, सरकारला जनतेने नापास केल्याचे दिसत असल्यानेच निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे.

5. पुणे आणि ठाणेकरांना मोदी सरकारची भेट, दोन मेट्रो प्रकल्पांना दिली मंजुरी

2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने पुणे आणि ठाणे शहरांमध्ये दोन मेट्रो प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल आणि चांगले वातावरण निर्माण होईल.

6. माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाहीत?, घरबसल्या आधार लिंक करा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक कोटींहून अधिक महिलांना पैसे मिळाले आहेत. ज्या महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही त्यांना पैसे मिळालेले नाहीत. घरबसल्या आधार कार्ड बँक खात्याशी कसे लिंक करायचे ते जाणून घ्या.

7. मोदींचा 'साउथ'ला दिलासा: कर्ज नाही, मदत देणार भारत !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लोबल साऊथ समिटमध्ये विकासाला चालना देण्यासाठी भारताची योजना मांडली. भारताच्या प्रस्तावामुळे गरजू देशांवर कर्जाचा बोजा पडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

8. भारतीय लष्कराचे 'हेल्थ क्यूब', युद्धभूमीवर करता येणार थेट आकाशातून उपचार!

भारतीय हवाई दल आणि भारतीय लष्कराने १५,००० फूट उंचीवरून एक पोर्टेबल हॉस्पिटल यशस्वीरित्या खाली पाडले. हे जगातील पहिले रुग्णालय आहे, जे विमानातून जमिनीवर सोडले जाऊ शकते. युद्ध असो वा नैसर्गिक आपत्ती, हे रुग्णालय अतिशय उपयुक्त ठरेल.

9. एक भारत एक तिकीट, भारतीय रेल्वेची ही नवीन योजना काय आहे?; जाणून घ्या

भारतीय रेल्वे, NCRTC ने 'वन इंडिया-वन तिकीट' योजना सुरू केली असून जी मेनलाइन ट्रेन्स आणि RRTS सेवांमध्ये अखंड बुकिंग, प्रवास प्रदान करते. प्रवासी आता IRCTC द्वारे रेल्वेचे ई-तिकीट बुक करू शकतात.

10. Caught on camera: उत्तर काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ दिसले पाकिस्तानी दहशतवादी

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, उत्तर काश्मीरमध्ये घुसखोरीचा कट रचणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. भारतीय लष्कर सतर्क असून, कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यास सज्ज आहे.