सार

राजकारणात संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांना टोला लगावला असून, मनोज जरांगेंवरही आरोप झाले आहेत. दुसरीकडे, मनोरंजन विश्वात अमिताभ बच्चन आणि श्रद्धा कपूर चर्चेत आहेत.
  1. संजय राऊतांचा प्रकाश आंबेडकरांना खोचक टोला, बाबासाहेबांचे खरे वारसदार कोण?

प्रकाश आंबेडकरांनी एकनाथ शिंदे यांना खरी शिवसेना असल्याचे म्हटल्यानंतर, खासदार संजय राऊत यांनी त्यांना खोचक टोला लगावला आहे. राऊत म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकरांचे खरे वारसदार रामदास आठवले आहेत.

2. नितेश राणे शेंबडा पोरगा, पोलीस वादग्रस्त वक्तव्य प्रकरणावरुन जलील यांचा हल्लाबोल

नितेश राणेंनी पोलीस अधिकाऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले. एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी राणेंवर जोरदार हल्लाबोल करत त्यांना शेंबड पोर असे संबोधलंय. जलील यांनी राणेंना पोलिसांनी मारहाण करायला हवी होती असेही म्हटले आहे.

3. मराठा आरक्षण: भुजबळ, फडणवीस टार्गेट? मनोज जरांगे यांनी दिला इशारा

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधत सत्तेतून बाहेर काढण्याचा इशारा दिला आहे. सरकारने २९ ऑगस्टपर्यंत वेळ दिली आहे.

4. मनोज जरांगे बिनबुडाचा लोटा, ओबीसी आरक्षणासाठी लढणाऱ्या लक्ष्मण हाकेंचा आरोप

लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी जरांगे यांना 'बिनबुडाचा लोटा' म्हटले असून ओबीसी उमेदवारांना पाडण्याचा आरोप केला आहे. जरांगे यांच्या शांतता रॅलीमुळे ओबीसींमध्ये अस्वस्थता असल्याचेही हाके म्हणाले.

5. मुंबईत न्याय यात्रेवरून काँग्रेस-भाजप आमनेसामने, नेमकं झाल काय?

काँग्रेसने मुंबईत सुरू केलेल्या न्याय यात्रेला भाजपने आक्रमकपणे प्रत्युत्तर देण्याची भूमिका घेतली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी काँग्रेसवर टीका करताना अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

6. मुंबईत हिट अँड रन: वर्सोवा बीचवर झोपलेल्या रिक्षाचालकाला चिरडले, दोघांना अटक

मुंबईतील वर्सोवा बीचवर झोपलेल्या ३६ वर्षीय रिक्षाचालकाला एका कारने चिरडल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी फरार मोटारचालकासह दोन जणांना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

7. स्वातंत्र्यदिनी दिल्लीत 'हे' रस्ते राहणार बंद, पर्यायी मार्ग जाणून घ्या

दिल्ली वाहतूक पोलिसांनी ७८ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी शहरातील काही प्रमुख रस्ते बंद राहणार असल्याची घोषणा केली आहे. प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. बस मार्गांमध्येही बदल करण्यात आले आहेत.

8. भारताची नौदल शक्ती वाढणार: INS अरिघाट लवकरच तैनात होणार

भारताची स्वदेशी आण्विक पाणबुडी INS अरिघाट लवकरच नौदलात सामील होणार आहे. त्यामुळे भारताची नौदल शक्ती अनेक पटींनी वाढेल. रिपोर्ट्सनुसार, यासाठी अनेक चाचण्या करण्यात आल्या आहेत आणि त्यात अनेक नवीन अपडेट्सही करण्यात आले आहेत.

9. KBC 16 च्या एका एपिसोडसाठी अमिताभ बच्चन यांनी वसूल केली एवढी Fees

अमिताभ बच्चन 'कौन बनेगा करोडपती' चा 16 वा सीजन सुरू झाला आहे. प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही प्रेक्षकांना बिग बी शो चे सूत्रसंचालन करताना दिसून येणार आहे. पण अमिताभ बच्चन यांनी बिग बॉसच्या शो साठी वसूल केलेली फी ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.

10. श्रद्धा कपूरला Stree-2 नव्हे रणबीरसोबतच्या सिनेमासाठी मिळालीय सर्वाधिक फी

अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिचा आगामी सिनेमा स्री-2 मुळे सर्वाधिक चर्चेत आहे. सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक फार उत्सुक आहेत. पण तुम्हाला माहितेय का, श्रद्धा कपूरला स्री-2 सिनेमाआधी एका सिनेमासाठी सर्वाधिक फी मिळालीय. याबद्दल जाणून घेऊया.