TMC च्या उमेदवार महुआ मोइत्रांच्या उर्जेचा स्रोत काय? पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देत म्हणाल्या..... (Watch Video)

| Published : Apr 18 2024, 01:34 PM IST / Updated: Apr 18 2024, 02:23 PM IST

mahua Moitra
TMC च्या उमेदवार महुआ मोइत्रांच्या उर्जेचा स्रोत काय? पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देत म्हणाल्या..... (Watch Video)
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

Lok Sabha Election 2024 : तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार महुआ मोइत्रा यांनी लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्रराचावेळी गेल्या असता एक विधान केले आहे. या विधानाचीच सध्या जोरदार चर्चा  सुरू झाली आहे.

Lok Sabha Election 2024 First Phase Voting : लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मदतान 19 एप्रिलला होणार आहेत. अशातच प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसच्या (Trinamool Congress) उमेदवार महुआ मोइत्रा (Mahua Moitra) यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक रिपोर्टर महुआ यांना त्यांच्या उर्जेचा स्रोत काय आहे? असा प्रश्न विचारताना दिसून येत आहे.

नक्की काय म्हणाल्या महुआ मोइत्रा? 
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महुआ मोइत्रा पश्चिम बंगालमधील कृष्णानगर येथे प्रचारासाठी निघालया होत्या. त्यावेळी एका रिपोर्टरने महुआ मोइत्रा यांना तुमच्या उर्जेचा स्रोत काय असा प्रश्न विचारला. यावर तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार महुआ यांनी उत्तर देत म्हटले की, ‘सेक्स’. याच विधानावरून आता महुआ मोइत्रांची चर्चा केली जात आहे.

 

लोकसभा निवडणुकीआधी महुआ मोइत्रांच्या अडचणींत वाढ
लोकसभा निवडणुकीआध महुआ मोइत्रा यांनी पश्चिम बंगालमधील कृष्णानगर जागेसाठी प्रचार केला. दुसऱ्या बाजूला महुआ यांच्या अडचणींत वाढ झाली आहे. कारण ‘कॅश फॉर क्वेरी’ प्रकरणात (Cash for query case) त्या अडकल्या गेल्या आहेत. सीबीआयनंतर(CBI) ईडीकडूनही (ED) महुआ यांच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंगचा (Money Laundering) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की काय आहे प्रकरण?
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात लोकसभेत महुआ मोइत्रा यांनी अनैतिक वर्तन केल्याने त्यांना निलंबित करण्यात आले होते. माजी खासदाराने या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात आव्हानही दिले आहे. खरंतर, भाजपच्या लोकसभेचे खासदार निशिकांत दुबे यांनी महुआ मोइत्रा यांच्यावर असा आरोप लावला होता की, त्यांनी व्यावसायिक गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अन्य काहींवर हल्ला करण्यासाठी हिरानंदानीकडून रोकड आणि गिफ्टच्या बदल्यात लोकसभेत प्रश्न विचारले होते. याच प्रकरणामुळे महुआ मोइत्र यांच्यासह संपूर्ण तृणमूल काँग्रेस बॅकफूटवर गेला होता. पण पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसने महुआ मोइत्रा यांना कृष्णानगर जागेवरून तिकीट दिले आहे.

आणखी वाचा : 

Ram Navami Violence : पश्चिम बंगालमध्ये रामनवमीच्या दिवशी हिंसाचार, शोभायात्रेवेळी स्फोटासह दगडफेक

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्तीसगड मध्ये माओवादीविरोधात मोठी कारवाई ; 29 माओवाद्यांना कंठस्नान

Read more Articles on