Ram Navami Violence : पश्चिम बंगालमध्ये रामनवमीच्या दिवशी हिंसाचार, शोभायात्रेवेळी स्फोटासह दगडफेक

| Published : Apr 18 2024, 07:39 AM IST / Updated: Apr 18 2024, 07:41 AM IST

West Bengal Violence on Ram Navami

सार

West Bengal : पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे झालेल्या हिंसाचारावरून ममता बॅनर्जींच्या सरकारवर भाजपने जोरदार निशाणा साधला आहे. भाजपने आरोप लावलाय की, पोलिसांच्या अपयशामुळे दगडफेक झाली. नक्की काय आहे प्रकरण जाणून घेऊया सविस्तर...

Ram Navami Clashes : पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा रामनवमीवेळी हिंसाचार झाल्याची घटना घडली. बंगालमधील मुर्शिदाबाद (Murshidabad) येथे बुधवारी (18 एप्रिल) रामनवमीच्या दिवशी काढण्यात आलेल्या शोभायात्रेवेळी हिंसाचार झाला. यामध्ये काहीजण जखमी झाले. मुर्शिदाबादमधील शक्तिपुर परिसरात शोभायात्रेवेळी कथित रुपात दगडफेक करण्यात आल्याने 20 जण जखमी झाले. याशिवाय स्फोटही झाला असता एक महिला जखमी झाली आहे.

भाजपने ममता बॅनर्जींवर साधला निशाणा
मुर्शिदाबाद येथे झालेल्या हिंसाचारावरून भाजपने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamata Banerjee) यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपने म्हटले की, यंदाच्या वर्षी पोलीस राम भक्तांची सुरक्षितता करण्यास अपयशी ठरली. गेल्या वर्षीही पोलिसांमुळेच दलखोला, रिशरा आणि सेरामपुर येथील शोभायात्रेवर दगडफेक करण्यात आली. यंदाच्या वर्षी प्रशासनाच्या परवानगीनंतरच शोभायात्रा काढली जात होती. तरीही शक्तिपुरमध्ये काही समाजकंटकांनी शोभायात्रेवर दगडफेक केली.

छतावरून शोभायात्रेवर दगडफेक
रिपोर्ट्सनुसार, मुर्शिदाबाद येथील दगडफेकीची घटना शक्तिपुर परिसरातून समोर आली आहे. येथे बुधवारी संध्याकाळी शोभायात्रा काढली जात होती. त्यावेळीच दगडफेक करण्यात आली. याचे काही व्हिडीओही समोर आले आहेत. दगडफेक करण्यात आल्यानंतर हिंसाचार झाला. या स्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

दगडफेक करण्यात आल्यानंतर जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यामध्ये जवळजवळ 20 जण जखमी झाल्याचे पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. 

रामनवमीच्या शोभायात्रेवेळी स्फोट
पीटीआयच्या वृत्तानुसार, मुर्शिदाबाद जिल्ह्यातील शक्तिपुर येथे बुधवारी संध्याकाळी रामनवमीच्या शोभायात्रेवेळी स्फोट झाला. त्यामध्ये एक महिला जखमी झाली. सध्या स्फोटासंदर्भात अधिक तपास सुरू आहे. जखमी महिलेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे,

समाजकंटकांसोबत उभी राहिली पोलीस, भाजपचा आरोप
भाजप नेते सुवेंदु अधिकारी यांनी शोभायात्रेवर दगडफेक आणि दुकानांची तोडफोड केल्याचा आरोप लावला आहे. प्रशासनाकडून शांततेत शोभायात्रा काढण्याची परवानगी घेतली होती. तरीही मुर्शिदाबादमधील शक्तिपुर आणि बेलगंडा-II ब्लॉक येथे समाजकंटकांनी शोभायात्रेवर हल्ला केला. तरीही पोलीस समाजकंटांसोबत उभी राहिली आणि राम भक्तांवर लाठीचार्ज केला.

आणखी वाचा : 

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्तीसगड मध्ये माओवादीविरोधात मोठी कारवाई ; 29 माओवाद्यांना कंठस्नान

RBI ची एकाचवेळी दोन बँकांवर मोठी कारवाई, खात्यातून केवळ 15 हजार रुपयांची रक्कम काढता येणार