सार

भारतात होणाऱ्या निवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोगाच्या वतीने जाहीर करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका या पाच टप्यांमध्ये होणार आहेत. महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे या कालावधीमध्ये निवडणुका पार पडणार आहेत.

भारतात होणाऱ्या निवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोगाच्या वतीने जाहीर करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका या पाच टप्यांमध्ये होणार आहेत. महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे या कालावधीमध्ये निवडणुका पार पडणार आहेत. यावेळी होणारी निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी जय्यत तयारी केली आहे. 

मतदान केंद्रावर मतदारांना जाताना ओळखपत्र दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे. दर्ववेळी ईव्हीएम मशीनवर निवडणुका घेतल्या जातात. पण यावर्षी मराठा बांधव निवडणुकीला मोठ्या संख्येने उभे राहणार असल्यामुळे बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्या लागतात की काय अशी शंका उपस्थित होत आहे. 

आपण मतदान करायला मतदान केंद्रावर गेल्यावर आपल्याला ओळखपत्र दाखवूनच मतदानासाठी परवानगी दिली जाणार आहे. त्यासाठी आपल्याकडे आधार कार्ड, मनरेगा कार्ड, बँक/पोस्ट ऑफिसने जारी केलेल्या फोटोसह पासबुक, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, NPR अंतर्गत RGI द्वारे जारी केलेले स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, छायाचित्रासह पेन्शन दस्तऐवज,  खासदार/आमदार/एमएलसी यांना जारी केलेली अधिकृत ओळखपत्रे युनिक डिसॅबिलिटी आयडी (UDID) कार्ड, सोशल द्वारे जारी केले जाते न्याय आणि अधिकारिता, भारत सरकार यापैकी एखादे कार्ड दाखवून मतदानासाठी प्रवेश मिळणार आहे. 
आणखी वाचा - 
Lok Sabha Election 2024 : देशात सात टप्प्यात लोकसभा निवडणूक होणार, पहिल्या टप्प्यातील निवडणूक 19 एप्रिलला
लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशातील जनतेला खुले पत्र, कलम 370 ते GST च्या मुद्द्यांवर टाकलाय प्रकाश