सार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेसाठी एक खुले पत्र लिहिले आहे. या पत्राच्या माध्यमातून पंतप्रधानांनी कलम 370 ते जीएसटीच्या मुद्द्यांचा उल्लेख केला आहे.
PM Narendra Modi Open Letter : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election) बिगुल वाजण्याआधी देशातील जनतेसाठी एक खुले पत्र जारी केले आहे. या पत्रामध्ये भाजप सरकारकडून करण्यात आलेल्या गेल्या 10 वर्षातील ऐतिहासिक निर्णयांचा लेखाजोखा व्यक्त केला आहे.
खुल्या पत्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम 370 रद्द करण्यासह जीएसटीचा (GST) उल्लेख केला आहे. याशिवाय पत्राच्या माध्यमातून देशातील जनतेचे आभारही पंतप्रधानांनी मानले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत किंवा विकसित भारताच्या संकल्पाला पूर्ण करण्यासाठी सल्ला देखील मागितला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खुले पत्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खुल्या पत्रातून देशातील जनतेला ‘माझे प्रिय परिवारातील सदस्य’ म्हटले आहे. याशिवाय पंतप्रधानांनी पत्रात लिहिलेय की, “140 कोटी भारतीयांचा विश्वास आणि पाठिंबा मला प्रेरित करतो. आमच्या सरकारने गरीब, शेतकरी, देशातील तरुण आणि महिलांच्या आयुष्याचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न केले आहेत.”
पत्रात पुढे म्हटले की, पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून भक्कम घर, वीज, पाणी आणि एलपीजी गॅसची (LPG) सुविधा पोहोवली आहे. याशिवाय, आयुष्मान भारतच्या माध्यमातून मोफत वैद्यकिय उपचार, शेतकऱ्यांना आर्थिक मदत, मातृ वंदना योजनेच्या माध्यमातून महिलांना सहाय्यता आणि केलेले अन्य प्रयत्न शक्य झाले आहेत. ही सर्व कामे नागरिकांच्या विश्वासामुळे शक्य झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिहेरी तलाकसह कलम 370 चा केला उल्लेख
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खुल्या पत्रात म्हटले की, "भारत परंपरा आणि आधुनिकतेच्या मुद्यांवर लक्ष केंद्रीत करत पुढे जात आहे. पुढच्या पिढीसाठी पायाभूत सुविधांचे अभूतपूर्व बांधकाम आणि आमच्या समृद्ध राष्ट्रीय, सांस्कृतिक वारशाचा कायाकल्प अशा दोन्ही गोष्टी देशाने पाहिल्या आहेत. खरंतर, हे तुमचा विश्वास आणि पाठिंब्यामुळे सर्वकाबी साध्य झाले आहे. आम्ही देशातील जनतेसाठी नेहमीच काही मोठे निर्णय घेतले आहेत."
आणखी वाचा :