Loksabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीची उमेदवारांची सहावी यादी केली जाहीर

| Published : Mar 25 2024, 06:07 PM IST

Congress

सार

काँग्रेसने लोकसभाईसाठी उमेदवारांची सहावी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये अनेक नेत्यांना तिकीट जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये राजस्थानमधील चार आणि तामिळनाडूतील एका उमेदवाराचा समावेश आहे.

काँग्रेसने लोकसभाईसाठी उमेदवारांची सहावी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये अनेक नेत्यांना तिकीट जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये राजस्थानमधील चार आणि तामिळनाडूतील एका उमेदवाराचा समावेश आहे. पक्षातील अनेक नेत्यांना तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी भाजप किंवा काँग्रेस पक्षात पक्षांतर केले आहेत. आता राजस्थान आणि तामिळनाडू येथून तिकीट जाहीर करण्यात आली आहेत. 

यामध्ये राजस्थानच्या उमेदवारांमध्ये अजमेरमधून रामचंद्र चौधरी राजमंसदमधून सुदर्शन रावत. भिलवाडमधून डॉ. दामोदर गुर्जर आणि कोट्यातून प्रल्हाद गुंजाळ यांच्या नावाचा समावेश आहे. तामिळनाडुतील तिरुनेलवेळी येथून पक्षाने वकील सी रॉबर्ट ब्रूस यांचे नाव देण्यात आले आहे. येथून काही ठिकाणी जुन्या उमेदवारांना तर काही ठिकाणी नवीन उमेदवारांना तिकीट देण्यात आली आहे. 

तामिळनाडूमध्ये काँग्रेसने दहा पैकी नऊ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील चंद्रपूर येथून प्रतिभा धानोरकर यांना लोकसभेचे तिकीट जाहीर करण्यात आले आहे. येथून त्यांचे पती सुरेश धानोरकर हे खासदार होते. त्यांच्या निधनानंतर येथील लोकसभेची पोटनिवडणूक झाली नव्हती. लोकसभा निवडणुकांचे अजूनही तिकीट जाहीर करण्यात येत असल्याचं विविध पक्षांच्या यादीवरून लक्षात येत आहे. 
आणखी वाचा - 
शिल्पकार अरुण योगीराज यांनी अयोध्येत बनवला राम लल्लाचा छोटा पुतळा, फोटो व्हायरल, पाहा
IPL 2024: रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याच्या चाहत्यांनी मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्यात एकमेकांना केली मारहाण; Video झाला व्हायरल