गायीची विक्री झाली तब्बल 40 कोटींना, आंध्र प्रदेशातील नेल्लोर येथील शेतकरी झाला मालामाल

| Published : Mar 29 2024, 11:31 AM IST

nellor Cow
गायीची विक्री झाली तब्बल 40 कोटींना, आंध्र प्रदेशातील नेल्लोर येथील शेतकरी झाला मालामाल
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

हिंदू धर्मात गायीला मातेचा दर्जा दिला जातो हे तुम्हाला माहित असेल. तर याच गाईची सर्वात जास्त किंमतीला खरेदी करण्यात आली आहे.

हिंदू धर्मात गायीला मातेचा दर्जा दिला जातो हे तुम्हाला माहित असेल. तर याच गाईची सर्वात जास्त किंमतीला खरेदी करण्यात आली आहे. आता आपण म्हणाल सर्वात महाग म्हणजे पाच लाख, दहा लाख पण चाळीस कोटींना एका गाईची विक्री तब्बल थोड्या थोडक्या नाही तर चाळीस कोटी रुपयांना झाली आहे. या गाईचा भारताशी संबंध असून याबद्दलची माहिती या लेखातून समजून घेणार आहोत. 

‘ही’ गाय कुठली आहे? -
ही गाय आंध्र प्रदेशातील नेल्लोर या ठिकाणची आहे. तिला व्हिएटिना-19 एफआयव्ही मारा इमोव्हिस म्हणून ओळखले जाते. ब्राझीलमध्ये एका लिलावादरम्यान या गायीची किंमत 4.8 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स होती, जी भारतीय रुपयांच्या मानाने ४० कोटी रुपये इतकी आहे. यामुळे ही जगातील सर्वात महागड्या किमतीत विकली जाणारी गाय ठरली आहे. गुरांच्या लिलावाच्या इतिहासात ही विक्री मैलाचा दगड ठरली आहे. रेशमी पांढरी फर आणि खांद्यावर विशिष्ट बल्बस कुबड असलेली ही गाय मूळची भारताची आहे.

नेल्लोर जिल्ह्याचे नाव:
या गायीचे नाव नेल्लोर जिल्ह्याच्या नावावरून ठेवण्यात आले आहे हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. ब्राझीलमध्ये या जातीला मोठी मागणी आहे. या जातीला वैज्ञानिकदृष्ट्या बॉस इंडिकस असे म्हणतात. शास्त्रज्ञांच्या मते, हे भारतातील ओंगोले गुरांचे वंशज आहे, जे तखासकरून त्यांच्या ताकदीसाठी ओळखले जातात. विशेष म्हणजे ते वातावरणानुसार स्वतःला जुळवून घेतात. ही प्रजाती 1868 मध्ये जहाजाने प्रथमच ब्राझीलला पाठवण्यात आली होती. 1960 च्या दशकात आणखी अनेक गायी येथे हलवण्यात आल्या.

गाईची वैशिष्टय घ्या जाणून :
ओंगोल जातीच्या गुरांची सर्वात मोठी खासियत म्हणजे ते अगदी उष्ण तापमानातही जगू शकतात. कारण त्यांची चयापचय क्रिया चांगली असते. यामध्ये कोणत्याही प्रकारचा संसर्ग होत नाही. ब्राझीलमध्ये खूप गरम वातावरण असूनही ही गाय तग धरून राहते. ही जात जनुकीयदृष्ट्या पुढे विकसित करण्यात आली आहे. यातून एक मूल निर्माण होणे अपेक्षित, त्यामुळे तिच्यात बदल होत गेले. ब्राझीलमधील सुमारे 80 टक्के गायी नेल्लोरच्या गायी आहेत.
आणखी वाचा - 
कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारीचा तुरुंगात मृत्यू, उत्तर प्रदेशमध्ये पोलीस अलर्ट मोडवर!
2024 Mood of the Nation Survey: पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून नरेंद्र मोदींना पहिली पसंती, दुसरा कोण?