सार

इंडिया आघाडी लोकसभेत बहुमत मिळवून सरकार स्थापन करेल असा दावा काँग्रेसच्या नेत्याने केला आहे. त्याने या निवडणुकीत इंडिया आघाडी 370 पेक्षा जास्त जागा जिंकेल असा दावा केला आहे. 

संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकांचे वातावरण असून सात टप्यांमध्ये निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकीमध्ये साधारणपणे इंडिया आघाडी आणि एनडीए या दोघांमध्येच लढत आपल्याला निवडणुकीच्या मैदानामध्ये दिसून आली आहे. भाजपच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली. या आघाडीने एकत्र येत निवडणुका लढवल्या असून आता काँग्रेस नेत्याने किती जागा मिळतील याबद्दल वाच्यता केली आहे. 

काँग्रेस नेत्याने केला दावा - 
इंडिया आघाडीला नवीन सरकार स्थापन करताना 350 जागा मिळतील आणि सरकार स्थापन केले जाईल, असे त्रिपुरा काँग्रेसचे अध्यक्ष आशिष कुमार साहा यांनी केला आहे. साहा यांनी बोलताना सांगितले आहे की, इंडिया आघाडीला लोकांचा चांगला पाठींबा मिळत असून आम्ही लवकरच सरकार स्थापन करू. भाजप पक्ष बहुमताच्या जवळ जाऊ शकणार नसल्याचा दावा यावेळी आशिष कुमार यांनी केला आहे. 

साहा पुढे काय म्हणाले? - 
साहा यांच्या म्हणण्यानुसार इंडिया आघाडीचे सरकार स्थापन करायचे आहे. भाजप सरकार खोटी आश्वासने देत असून लोकांना मूर्ख बनवण्याचे काम सरकारकडून केले जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्रिपुरामध्ये सीपीएम आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी लोकसभेच्या जगणावर उमेदवार उभे केले असून हे इंडिया आघाडीचेच घटक पक्ष आहेत. त्रिपुरामध्ये पूर्व त्रिपुरा आणि पश्चिम त्रिपुरा असे दोनच भाग असून आशिष साहा हे स्वतः निवडणुकीला उभे राहिलेले आहेत. ते काँग्रेसकडून पश्चिम त्रिपुरामधून उभे असून त्यांची लढत भाजपचे बिप्लब देव कुमार यांच्याशी होत आहे. या दोघांमधील सामना रंगतदार होणार असून कोण जिंकेल ते 4 जुनलाच समजणार आहे. 
आणखी वाचा - 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिक आणि मुंबई दौऱ्यावर, नाशिकच्या सभेनंतर मुंबईत करणार रोड शो
कंगना राणावत यांनी मंडी लोकसभा मतदारसंघातून भरला उमेदवारी अर्ज, त्यांची विक्रमादित्य सिंग यांच्याशी होणार तुल्यबळ लढत