सार

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाचव्या टप्यातील प्रचारासाठी मुंबई आणि नाशिक येथे येणार असून एनडीए आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. नाशिक येथे सभा घेतल्यानंतर मुंबईतील घाटकोपर येथे त्यांचा रोड शो होणार आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. सर्वात आधी ते नाशिक येथे प्रचारसभा घेणार असून त्यानंतर ते मुंबईत रोड शो करणार असल्याची माहिती मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाचव्या टप्यातील निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात येणार असून भाजपने मुंबई आणि नाशिकमधील लोकसभा जागांवर ताकद लावल्याचे दिसून आले आहे. 

नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार सभा - 
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकमध्ये एनडीए आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रचाराला येणार आहेत. येथे नाशिक, दिंडोरी आणि धुळे लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचाराला पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. नाशिकमधून शिवसेनेचे हेमंत गोडसे, दिंडोरीतून भाजपच्या भारती पवार आणि धुळे येथून भाजपचे सुभाष भामरे हे पाचव्या टप्यातील लोकसभा निवडणुकांसाठीच्या जागा लढवत आहेत. पंतप्रधान नाशिकमध्ये येणार असल्यामुळे लढत रंगतदार होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

पाचव्या टप्यातील निवडणुकांचा प्रचार - 
पाचव्या टप्यातील मतदानाची तारीख जवळ येत असताना प्रचाराला खरी रंगत येताना दिसून येत आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, नाशिक, धुळे आणि दिंडोरी या लोकसभा मतदारसंघामध्ये पाचव्या टप्यातील निवडणुका पार पडणार आहेत. नाशिकच्या निवडणुका जवळ येत असताना महायुती आणि महाविकास आघाडी या दोनही पक्षांकडून मोठया प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत. 

मुंबईत पंतप्रधानांचा मोठा रोड शो - 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईत आजच मोठा रोड शो आयोजित केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पिंपळगाव बाजार समितीतील सभेला संबोधित केल्यानंतर मुंबईकडे रवाना होतील. मुंबईमध्ये आल्यानंतर मुंबई उत्तर पूर्व लोकसभेचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्यासाठी घाटकोपर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रोड शो घेणार आहेत. पंतप्रधानांचा रोड शो असल्यामुळे वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. 
आणखी वाचा - 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज केला दाखल, तिसऱ्यांदा खासदार होऊन बनणार देशाचे पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथे उमेदवारी अर्ज भरताना केले जोरदार शक्तिप्रदर्शन, महाराष्ट्रातील कोण कोण नेते होते उपस्थित?