TCS Work from Office Policy: TCS ने वर्क-फ्रॉम-ऑफिसचे नियम अधिक कठोर केले आहेत. ऑफिसमध्ये न येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे ॲनिव्हर्सरी अप्रेझल थांबवले आहे. जाणून घ्या नवीन WFO पॉलिसी, उपस्थितीचे नियम आणि कर्मचाऱ्यांवर होणारा परिणाम.
TCS Appraisal on Hold: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने वर्क-फ्रॉम-ऑफिसबाबतचे नियम आणखी कठोर केले आहेत. आता ठरलेल्या नियमांनुसार ऑफिसमध्ये न येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वार्षिक अप्रेझलवर थेट परिणाम दिसू लागला आहे. कंपनीने काही कर्मचाऱ्यांचे ॲनिव्हर्सरी अप्रेझल सध्या थांबवले आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ज्या कर्मचाऱ्यांनी गेल्या काही तिमाहींमध्ये वर्क-फ्रॉम-ऑफिस (WFO) चे नियम पूर्ण केले नाहीत, त्यांचे अंतिम ॲनिव्हर्सरी अप्रेझल होल्डवर ठेवण्यात आले आहे. अनेक प्रकरणांमध्ये, मॅनेजर स्तरावर प्रक्रिया पूर्ण झाली आहे, परंतु कंपनीच्या कॉर्पोरेट सिस्टममध्ये त्याला पुढे मंजुरी मिळत नाहीये. अशा कर्मचाऱ्यांचा परफॉर्मन्स निकाल सध्या जाहीर केला जाणार नाही.
TCS च्या फ्रेशर्सवर जास्त परिणाम
TCS मध्ये ॲनिव्हर्सरी अप्रेझल सामान्यतः फ्रेशर्ससाठी असते. जेव्हा एखादा कर्मचारी एक वर्ष पूर्ण करतो, तेव्हा त्याला अधिकृत ई-मेल मिळतो आणि अल्टिमॅटिक्स पोर्टलवर अपडेट केले जाते. कंपनीने 2022 मध्येच लॅटरल हायर कर्मचाऱ्यांसाठी ही प्रणाली बंद केली आहे, त्यामुळे सध्याचा निर्णय बहुतेक फ्रेशर्सवर परिणाम करत आहे.
TCS च्या अंतर्गत मेलमध्ये कठोर इशारा
एका अंतर्गत ई-मेलनुसार, काही कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले आहे की त्यांची अप्रेझल प्रक्रिया पूर्ण झाली आहे, परंतु जुलै ते सप्टेंबर 2025 पर्यंत ऑफिस अटेंडन्सचे नियम पूर्ण न केल्यामुळे ती पुढे प्रोसेस केली जाणार नाही. मेलमध्ये असा इशाराही देण्यात आला आहे की, जर पुढेही नियमांचे पालन झाले नाही, तर कर्मचाऱ्याला FY26 च्या संपूर्ण बँडिंग प्रक्रियेतून बाहेर ठेवले जाऊ शकते.
काय आहे TCS ची WFO अटेंडन्स पॉलिसी, जी आता अप्रेझलची अट बनली आहे?
सामान्यतः अप्रेझलमध्ये ध्येय निश्चित करणे, वर्षभरातील कामगिरी आणि मॅनेजरचे मूल्यांकन यांचा समावेश असतो. पण आता TCS मध्ये या संपूर्ण प्रक्रियेची पहिली अट ऑफिसला येणे ही बनली आहे. म्हणजेच, जर उपस्थिती योग्य नसेल, तर बाकी सर्व व्यर्थ ठरू शकते. TCS ने स्पष्ट केले आहे की कर्मचाऱ्यांना आठवड्यातून पाचही दिवस ऑफिसमधून काम करावे लागेल. जिथे अनेक आयटी कंपन्या अजूनही हायब्रीड मॉडेलवर चालत आहेत, तिथे TCS ने पूर्ण-वेळ ऑफिस पॉलिसी स्वीकारली आहे. कंपनीने परफॉर्मन्स रेटिंग आणि व्हेरिएबल सॅलरीलाही ऑफिस अटेंडन्सशी जोडले आहे.
काही प्रकरणांमध्ये कर्मचाऱ्यांना दिलासा
कंपनीने काही प्रकरणांमध्ये कर्मचाऱ्यांना दिलासाही दिला आहे. वैयक्तिक कारणांमुळे प्रत्येक तिमाहीत 6 दिवसांपर्यंतची सूट घेता येते, जी पुढे जोडली जात नाही. ऑफिस स्पेस किंवा नेटवर्कशी संबंधित समस्यांसाठी वेगळ्या रिक्वेस्टचा पर्याय देण्यात आला आहे. तथापि, कंपनीने स्पष्ट केले आहे की उपस्थितीमध्ये नंतर कोणताही बदल किंवा ॲडजस्टमेंट होणार नाही.

