सार
तामिळनाडूच्या एका मंदिरात फळांचा लिलाव करण्यात आला तिथे फळांना उच्चांकी भाव मिळाला आहे. येथे नऊ लिंबांना २.३६ लाख रुपयांची बोली लागली.
तामिळनाडूच्या एका मंदिरात फळांचा लिलाव करण्यात आला तिथे फळांना उच्चांकी भाव मिळाला आहे. येथे नऊ लिंबांना 2.36 लाख रुपयांची बोली लागली.लिंबांना मिळालेल्या या उच्चांकी भावामुळे सगळीकडे याबद्दलच्या चर्चांना उधाण आले आहे. या लिंबाच्या मदतीने वंध्यत्व बरे केले जाते असा समज आहे. दरवर्षी अनेक जोडपी येथे लिंबू मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात.
या लिलावात नऊ दिवस चालणाऱ्या उत्सवात रोज एक लिंबू काढला जातो आणि त्या लिंबूमध्ये वंध्यत्व घालवण्याची शक्ती असल्याचे भक्तांचा अंदाज आहे. या मंदिरात हे लिंबू मिळवण्यासाठी अनेक भाविक गर्दी करत असतात. लिंबू वंध्यत्व बरे करतो असा समज असल्याने अनेक भाविक येथे येत असतात असे येथील एका गावकऱ्याने सांगितले.
यावर्षी येथील लिंबांना चांगली बोली लागली. येथील उत्सवाच्या वेळी उकडले गेलेले प्रत्येक लिंबू हे पवित्र मानले जाते. कुलथूर गावातील भक्तांच्या जोडीने यावर्षी लिंबू खरेदी केले असे सांगितले. लिलावानंतर ज्यांनी बोली लावली आहे ते पवित्र स्नान करतात आणि लिंबू घेण्यासाठी परत येतात. हे लिंबू त्यांना मंदिराच्या पुजाऱ्याने दिलेले असते.
आणखी वाचा -
तर महिलांना दगडाने ठचून मारणार... तालिबानच्या नेत्याचा पुन्हा एकदा फर्मान; अफिगाणिस्थानात महिलांना जगणे झाले मुश्किल
Layoffs in Argentina : अर्जेंटिनामध्ये 70 हजार शासकीय कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, राष्ट्रध्यक्ष जेव्हियर माइली यांचे संकेत