सार
T२० World Cup २०२४ चा सर्वात रोमांचक सामना रविवारी न्यूयॉर्क शहरात खेळला गेला. भारतीय फलंदाजांच्या अत्यंत खराब कामगिरीनंतरही गोलंदाजांनी सहज विजय मिळवून दिला.
T20 World Cup 2024 Ind Vs Pak: T२० World Cup २०२४ चा सर्वात रोमांचक सामना रविवारी न्यूयॉर्क शहरात खेळला गेला. भारतीय फलंदाजांच्या अत्यंत खराब कामगिरीनंतरही गोलंदाजांनी सहज विजय मिळवून दिला. पाकिस्तान संघाला १२० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करता आला नाही. २० षटकांच्या अखेरीस पाकिस्तानी फलंदाज ७ विकेट गमावून केवळ ११३ धावा करू शकले. भारताने पाकिस्तानचा ६ धावांनी पराभव केला.
सामना झाला चुरशीचा -
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सर्वात चुरशीचा सामना रविवार ९ जून रोजी झाला. मात्र, पावसामुळे सामना नियोजित वेळेपेक्षा ५० मिनिटे उशिरा सुरू झाला. नाणेफेकीनंतर पाकिस्तान संघाच्या कर्णधाराने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय फलंदाजांची कामगिरी अत्यंत खराब होती. प्रथम फलंदाजी करताना संपूर्ण संघ १९९ धावांत ऑलआऊट झाला. पहिल्या पॉवर प्लेमध्ये त्यांनी दोन गडी गमावून ५० धावा केल्या, पुढच्या १३ षटकात त्यांनी केवळ ६९ धावा केल्या आणि ८ विकेट गमावल्या. सलामीवीर रोहित शर्मा आणि विराट कोहली स्वस्तात परतले.
शर्माने १३ तर कोहलीने ४ धावा केल्या. पहिली विकेट पडल्यानंतर आलेल्या ऋषभ पंतने डावाची धुरा सांभाळली. पंतने ३१ चेंडूत ६ चौकारांच्या मदतीने ४२ धावा केल्या. ऋषभ पंतला बाबर आझमच्या हातून मोहम्मद अमीरने झेलबाद केले. अक्षर पटेलनेही २० धावांचे योगदान दिले. मात्र या दोघांनंतर आलेल्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. सूर्य कुमार यादवने ७ आणि शिवम दुबेने ३ धावा केल्या. हार्दिक पांड्याने ७ धावा केल्या तर रवींद्र जडेजाने खातेही उघडले नाही. अर्शदीप सिंग ९ धावांवर धावबाद झाला. जसप्रीत बुमराहलाही खाते उघडता आले नाही. मोहम्मद सिराजने ७ धावा केल्या. संपूर्ण संघ ११९ धावांवर बाद झाला. नसीम शाह आणि हरिस रौफने प्रत्येकी ३, मोहम्मद अमीरला २ आणि शाहीन आफ्रिदीला एक विकेट मिळाली.
पाकिस्तानची सुरुवात चांगली आहे पण…
भारतीय संघाने दिलेले 1१२० धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी पाकिस्तानच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली. मोहम्मद रिझवानने ३१ तर बाबर आझमने १३ धावा केल्या. उस्मान खान, फखर जमान यांनीही प्रत्येकी १३ धावांचे योगदान दिले. इमाद वसीमने १२ आणि शादाब खानने ४ धावा केल्या. इफ्तिखार खाननेही ५ धावा केल्या. २० षटकांच्या अखेरीस पाकिस्तानने ७ गडी गमावून केवळ ११३ धावा केल्या. पाकिस्तान संघाला सहा धावांचे लक्ष्य गाठता आले नाही. जसप्रीत बुमराहने ३ आणि हार्दिक पांड्याने २ विकेट घेतल्या तर अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंगला प्रत्येकी एक विकेट मिळाली.