सार

रामकृष्ण मिशनचे अध्यक्ष स्वामी स्मरणानंद महाराज यांचे निधन झाले आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

Swami Smaranananda Died : रामकृष्ण मिशन आणि मठाचे अध्यक्ष स्वामी नारायण महाराज यांचे दीर्घकाळाच्या आजाराने निधन झाले आहे. ते 95 वर्षांचे होते. दक्षिण कोलकाता येथील रामकृष्ण मिशन सेवा प्रतिष्ठानच्या रुग्णालयात स्वामी स्मरणानंद महाराज यांनी अखेरचा श्वास घेतला. दीर्घकाळ आजारी असल्याने गेल्या काही दिवसांपासून स्वामी स्मरणानंद महाराज यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केले दु:ख
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये पंतप्रधानांनी लिहिले की, “माझे स्वामी स्मरणानंद महाराज यांच्यासोबत फार जवळचे संबंध होते. मला वर्ष 2020 मधील बेलूर मठातील माझा प्रवास आठवतोय, त्यावेळी मी त्यांच्याशी संवाद साधला होता. काही आठवड्याआधी कोलकाता येथील रुग्णालयातही भेट देत त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारपूस केली होती. माझ्या संवेदना बेलूर मठातील सर्व भक्तांसोबत आहेत. ओम शांति.”

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगालच्या दौऱ्यावर 5 मार्चला आले होते. यावेळी कोलकाताला आले असता पंतप्रधानांनी महाराजांची रुग्णालयात भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे ट्विट
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamta Banerjee) यांनी म्हटले की, “स्मरणानंदजी महाराज यांच्या निधनाची बातमी ऐकून फार दु:ख झाले आहे. स्वामी स्मरणानंदजी यांनी आपल्या आयुष्यात रामकृष्णवाद्यांच्या जागतिक व्यवस्थेला आध्यात्मिक नेतृत्व प्रदान केले आणि जगभरातील कोट्यवधी भक्तांसाठी ते समाधानाचे ते एक मार्ग होते. मी सर्व भिक्षुक, अनुयायी आणि भक्तांप्रति आपल्या संवेदना व्यक्त करते”

दरम्यान, रामकृष्ण मठ आणि मिशनचे माजी अध्यक्ष स्वामी आत्मस्थानंद महाराज यांच्या निधनानंतर स्वामी स्मरणानंद महाराज यांना जुलै, 2017 मध्ये रामकृष्ण मठ आणि मिशनचे 16व्या अध्यक्षाच्या रुपात पदभार सांभाळला होता. गेल्या सहा महिन्यांपासून स्वामी स्मरणानंद आरोग्यासंबंधित समस्यांनी ग्रासले होते.

आणखी वाचा : 

भाजपने बशीरहाट लोकसभा मतदारसंघातून रेखा पात्रा यांना दिले लोकसभेचं तिकीट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उमेदवाराला केला कॉल

सद्गुरुंच्या तब्येतीत चांगली सुधारणा, सोशल मीडियावर पोस्ट टाकून दिली माहिती

शिल्पकार अरुण योगीराज यांनी अयोध्येत बनवला राम लल्लाचा छोटा पुतळा, फोटो व्हायरल, पाहा