सार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बंगालमधील संदेशखळी येथील एका लैंगिक छळाच्या पीडितेला फोन केला होता. त्यांना बशीरहाट लोकसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बंगालमधील संदेशखळी येथील एका लैंगिक छळाच्या पीडितेला फोन केला होता. त्यांना बशीरहाट लोकसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवार आहे. त्यांना निवडणुकीच्या तयारीबद्दल विचारणा केली होती. रेखा यांनी नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला आहे. त्यांनी यावेळी नारी शक्तीचा उल्लेख केला आहे. 

यावेळी नरेंद्र मोदी यांच्याशी पीडित रेखा यांनी संवाद साधला. त्यांनी सुरुवातीला झालेल्या त्रासाबद्दलची माहिती पंतप्रधानांना दिली. त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांकडून झालेल्या त्रासाबद्दल माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने पाठींबा दिल्याबद्दल यावेळी आभार मानले आहेत. संदेशखळी येथील रहिवाशांनी तृणमूल काँग्रेसवर विविध आरोप केले. 

संदेशखळी येथील रहिवाशांनी जमीन बळकावणे, खंडणी आणि लैंगिक छळाचे आरोप तृणमूल काँग्रेस नेत्यांवर केले आहेत. त्यामुळे संदेशखळी येथून मतदारसंघ असलेल्या बशीरहाट येथून भाजपने रेखा यांना उमेदवारी दिली आहे. रेखा पात्रा यांना उमेदवारी दिल्यामुळे येथे भाजपचा उमेदवार निवडून येतो का तृणमूल काँग्रेसचा याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
आणखी वाचा - 
होळीच्या दिवशी दिल्लीत नवऱ्याने चिरला बायकोचा गळा, पोलीस घटनास्थळी पोहचल्यावर बायको दिसली रक्ताच्या थारोळ्यात
सद्गुरुंच्या तब्येतीत चांगली सुधारणा, सोशल मीडियावर पोस्ट टाकून दिली माहिती