MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • India
  • Bengal Politics : शपथविधीपूर्वीच बंगालमध्ये खळबळ! सुवेंदू अधिकारींच्या पीएची गोळ्या झाडून हत्या, राजकारण तापलं

Bengal Politics : शपथविधीपूर्वीच बंगालमध्ये खळबळ! सुवेंदू अधिकारींच्या पीएची गोळ्या झाडून हत्या, राजकारण तापलं

Bengal Politics :  पश्चिम बंगाल निवडणूक २०२६ मध्ये भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर एक धक्कादायक घटना घडली आहे. मध्यमग्राममध्ये विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांचे निकटवर्तीय पीए चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. 

2 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : May 07 2026, 09:15 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या
Image Credit : X

विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या

सर्वात मोठी धक्कादायक बातमी म्हणजे, मध्यमग्राममध्ये विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांचे निकटवर्तीय सहकारी आणि पीए चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण बंगालच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. चंद्रनाथ रथ एका काळ्या स्कॉर्पिओ गाडीत असताना बाईकवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेनंतर पोलिसांनी त्यांना मृत घोषित केलं.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
हत्येनंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण
Image Credit : X

हत्येनंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण

मध्यमग्राममधील या हत्येनंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. प्राथमिक माहितीनुसार, अज्ञात हल्लेखोरांनी चंद्रनाथ यांना लक्ष्य करून गोळ्या झाडल्या. घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भाजप नेत्यांनी याला 'राजकीय सूड' म्हटलं आहे, तर टीएमसीने हे आरोप फेटाळून लावले आहेत. निवडणूक निकालानंतर अनेक भागांमध्ये तणाव कायम असताना सुवेंदू अधिकारींच्या जवळच्या व्यक्तीच्या हत्येने कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

Related Articles

Related image1
West Bengal Elections : पश्चिम बंगालमध्ये भाजप विजयाच्या उंबरठ्यावर, १२१ जागांवर आघाडी
Related image2
West Bengal : बंगालमध्ये भाजप सरकार, शपथविधीची तारीख ठरली; पण मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स कायम!
35
पश्चिम बंगाल विधानसभेत भाजपने २०० चा आकडा पार
Image Credit : X

पश्चिम बंगाल विधानसभेत भाजपने २०० चा आकडा पार

२९४ जागांच्या पश्चिम बंगाल विधानसभेत भाजपने २०० चा आकडा पार करत राजकीय इतिहास रचला आहे. १५ वर्षांपासून सत्तेत असलेलं ममता बॅनर्जींचं सरकार या निवडणुकीत पिछाडीवर पडलं. सर्वात मोठा राजकीय धक्का म्हणजे, ममता बॅनर्जी स्वतः भवानीपूर मतदारसंघात सुवेंदू अधिकारी यांच्याकडून पराभूत झाल्या. राजकीय विश्लेषकांच्या मते, हे केवळ सत्तांतर नसून बंगालच्या राजकीय संस्कृतीतील मोठा बदल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याला 'कामाच्या राजकारणाचा विजय' म्हटलं आहे, तर विरोधकांनी ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत 'जनादेश चोरल्याचा' आरोप केला आहे.
45
सरकारचा शपथविधी सोहळा ९ मे रोजी
Image Credit : X

सरकारचा शपथविधी सोहळा ९ मे रोजी

पश्चिम बंगाल भाजपचे अध्यक्ष समिक भट्टाचार्य (Samik Bhattacharya) यांनी घोषणा केली आहे की, नवीन सरकारचा शपथविधी सोहळा ९ मे रोजी कोलकात्याच्या ब्रिगेड परेड ग्राऊंडवर होणार आहे. वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे देखील या सोहळ्याला उपस्थित राहू शकतात. दरम्यान, भाजपने बंगालच्या विधिमंडळ नेत्याच्या निवडीसाठी अमित शाह यांना केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्त केलं आहे, तर आसामसाठी ही जबाबदारी जेपी नड्डा यांच्याकडे दिली आहे.
55
सुवेंदू अधिकारी यांनी निवडणुकीनंतरच्या हिंसेवर प्रतिक्रिया
Image Credit : X

सुवेंदू अधिकारी यांनी निवडणुकीनंतरच्या हिंसेवर प्रतिक्रिया

सुवेंदू अधिकारी यांनी निवडणुकीनंतरच्या हिंसेवर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, 'यावेळची परिस्थिती २०२१ इतकी भीषण नाही.' त्यांनी दावा केला की, 'भाजपला ४६% मतं मिळाली आहेत आणि पुढच्या वेळी हा आकडा ६०% पर्यंत जाईल.' मात्र, कोणत्याही प्रकारची हिंसा स्वीकारार्ह नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. २०२१ च्या निवडणुकीनंतरच्या हिंसेचा उल्लेख करत ते म्हणाले की, त्यावेळी १ लाखांहून अधिक लोकांना घरं सोडावी लागली होती आणि हजारो एफआयआर दाखल झाले होते. यावेळीही अनेक भागांतून हल्ल्याच्या बातम्या येत असल्या तरी, भाजप याला 'मर्यादित घटना' म्हणत आहे.
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
भारताचे बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Now Playing
Vivekanand Patil Speech 10 Oct 2026 | विवेकानंद पाटील संपूर्ण भाषण | Navnath ban | MPSC Pune Protest
Recommended image2
Now Playing
MPSC Pune Protest | राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यानेच मांडली व्यथा | State health Department
Recommended image3
Berlin Marathon: बर्लिन मॅरेथॉनमध्ये चिनी इन्फ्लुएन्सरची चोरी पकडली, सायकलवरून मारली शॉर्टकट!
Recommended image4
Morgan Stanley: मॉर्गन स्टॅनलीने MARA, RIOT, GLXY चे टार्गेट घटवले, तरीही १००% पेक्षा जास्त फायद्याची शक्यता
Recommended image5
Now Playing
Uddhav Thackeray | भाषण ऐका, म्हणाल, राजकारणात 'माया' नाही आणि जंगलात 'क्रूरता' नाही
Related Stories
Recommended image1
West Bengal Elections : पश्चिम बंगालमध्ये भाजप विजयाच्या उंबरठ्यावर, १२१ जागांवर आघाडी
Recommended image2
West Bengal : बंगालमध्ये भाजप सरकार, शपथविधीची तारीख ठरली; पण मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स कायम!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved